रशियात डॉ.अण्णाभाऊ साठेच्या गौरवार्थ नायगावात अभिनंदनाची जाहीरसभा !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
……………………………..
महाराष्ट्राच्या मातीत जन्मा आलेले प्रतिभावंत मराठी साहित्य सत्यशोधक डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे विपुल साहित्य साता समुद्रापलीकडे पोहोचले, रशिया सारख्या प्रगतिशील महान राष्ट्राने त्यांच्या साहित्याची दखल घेऊन त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रशियातील मास्को शहरात अण्णाभाऊचा भव्य पुतळा ऊभारून त्याचे अनावरण नुकतेच करण्यात आले या गौरवार्थ नायगाव शहरात अभिनंदनची जाहीर सभा आयोजित करून रशिया सरकारचे जाहीर अभिनंदन व आभार मानले.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साहित्यिक म्हणून महासत्ता असलेल्या रशिया देशाने सत्यशोधक डॉ. अण्णाभाऊ साठेचा पुतळा उभारला यांचा आनंद महाराष्ट्राच्या मराठी माणसांना निश्चित झालेला आहे. या गौरवार्थ नायगाव येथे रशियन सरकारने अभिनंदन व आभार व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या अभिनंदन सोहळा कार्यक्रमात अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विचारवंत डॉ. शंकर गड्डमवार यासह युवा नेते भास्कर पाटील भिलवंडे, जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे, पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, प्रा. बलभीम वाघमारे, रा.ना. मेटकर, प्रा. संजय भालेराव, पं. स. सदस्य नामदेव कांबळे, प्रभाकर पाटील कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती, प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक डॉ.अण्णाभाऊ साठे या राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन केल्यानंतर प्रस्ताविक आयोजक शा.माधव बैलकवाड यांनी केले तर उपस्थित मान्यवरांनी रशियन सरकारचे आपल्या मनोगतात आभार व्यक्त केले.
शेवटी अध्यक्षीय भाषणात डॉ.शंकर गड्डमवार यांनी अण्णाभाऊच्या साहित्यासह विविध विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी सेवानिवृत्त सपोनी शेषराव रोडे,प्रा.इरवंत सुर्यकार, पी.एस. वाघमारे, सुरेश वाघमारे आर्मी, गणपत रेड्डी, उत्तम गवाले, रामेश्वर गायकवाड, जनमित्र विक्रम भालेराव, शंकर गायकवाड, चंद्रकांत आईलवार, डी के पवार, पेंटर शिवाजी पवार, दिगंबर झुंजारे, प्रभाकर घंटेवाड, अक्षय बोयाळ, पूनम धमणवाडे, साहेबराव सूर्यकार, बळवंत वाघमारे, शाहीर बळी जाधव, शाहीर नामदेव जाधव, कॉम्रेड बाबुराव सुरेकार यासह समाज बांधव यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक गंगाधर कोतवार तर आभार प्रकाशभाऊ हनमंते यांनी मानले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या