उमरी शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
आज दिनांक 28/08/ 2022 रोजी उमरी शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सार्वजनिक जयंती सोहळा अण्णाभाऊ साठे नगर उमरी येथे अगदी साध्या स्वरूपात साजरा करण्यात आला आहे. 
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रवीण भाऊ सारडा साहेब यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त सहशिक्षक प्रभाकर नामवाड सर हे होते.

सामाजिक कार्यकर्ते प्रकाशराव तुमकुंटे सहशिक्षक नामवाड सर, विष्णूभाऊ पंडित, भगवान मुदिराज, माजी नगराध्यक्ष अनिल सोनकांबळे, माजी नगरसेवक राजेश सवई,संभाजी वरवटकर, आकाश सदमवार, गजानन आडगुडवार, द्रोणाचार्य सर, रवींद्र गायकवाड, शिवाजी सुकंळे,सदानंद गायकवाड, संतोष नामेवार, शिवाजी शेळके, जयंती मंडळाचे अध्यक्ष माधव गायकवाड उपाध्यक्ष राजू शेळके आदी समाज बांधव उपस्थित होते.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती मंडळाचे आयोजक इरबाजी शेळके, माजी नगरसेवक यांनी केले तर आभार डी एन कांबळे सर यांनी मानले आहे.
कै. माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे दुःखद निधन झाल्यामुळे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी साहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सन 2022 चा जयंती उत्सव सोहळा अगदी साधेपणाने साजरा करून या वर्षीचे जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
Www.massmaharashtra.com 
 #अण्णाभाऊ_साठे #annabhausathe

ताज्या बातम्या