कुंटूर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती दरवर्षी प्रमाणे उत्साहाने साजरी .

शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा !          – डॉ.प्रा.गो.रा. परडे सर

[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील मौजे कुंटूर येथे नागरिकांनी २८ ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन उत्साहात आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सव साजरी केली आहे.

यावेळी राजेश गंगाधरराव देशमुख कुंटूरकर – चेअरमन कुंटूरकर शुगर, मा. रूपेश गंगाधरराव देशमुख कुंटूरकर, सुर्याजी पा चाडकर, शिवाजी पा होळकर, बाबुराव पाटील आडकिने, सुर्यकांत पा कदम, मारोतराव पा कदम, जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर चे मुख्याध्यापक मा संजय सिंग राजपुत सर, डॉ प्रा गो रा परडे, डॉ प्रा बाळु दुगडूमवार यानी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

स्व.गंगाधरराव कुंटूरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. लाल झेंडा फडकावून मान वंदना देण्यात आली व समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ आमोल झुंजारे, एम बि चंद्रकांत वाघमारे, सुधिर वाघमारे, रामदास वाघमारे, यांचा सत्कार करण्यात आला. अन्नाभाऊ साठे यांची जयंती निमित्त वृक्षारोपन करण्यात आले.

प्रा डाँ गो. रा परडे यानी बोलताना सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे शिका, संगठीत व्हा, आणि संघर्ष करा. आपला समाज शिक्षण घेऊन मोठा पदाधिकारी बनला पाहीजे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहीजे एक जुटीने राहीले पाहिजे असा विचार मांडला.
यावेळी गावातील रज्जाक शेख, मोहनराव होळकर, गंगाधर तोडे, दिलीप गजभारे, दता नालीकंटे, पत्रकार शंकर आडकीने, पवनकुमार पुठेवाड पत्रकार बालाजी हनमंते चंदु अंबटवाड उपस्थित होते.
सुत्रसंचलन मा बालाजी वाघमारे, व वीनोद झुंजारे, यांनी केले प्रास्ताविक भाषणात पिराजी वाघमारे सर यांनी लोकसभा व आमदार निधीतून सभामंडप व सोरक्षन भिंत बांधून देण्याची मागणी केली.
या जयती मंडळाचे अध्यक्ष,संतोष झुंजारे उपाध्यक्ष,बाबुराव झुंजारे, सचिव, जिवन वाघमारे, सदस्य,रतन झुंजारे दता झुंजारे समाजातील सर्व नागरीक परीश्रम घेतले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या