नायगाव येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती थाटात साजरी !
[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
महात्मा फुले कॉलेजच्या वतीने महात्मा फुले कॉलनीतील सभागृहामध्ये माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव पाटील चव्हाण यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी प्रमुख मान्यवरांची व नगरसेवकांची उपस्थिती होती. मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्रावर आपले विचार व्यक्त केले.