नरसीत अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती उत्सहात साजरी !

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यातील नरसी येथे साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती दि.१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नरसी येथील जुने गावात व लहुजी साळवे नगर येथे मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.      
 यावेळी साठे नगर येथे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे यांच्या हस्ते व लहुजी साळवे नगर येथे काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सर्व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे,रविंद्र पाटील भिलवंडे, भास्कर पाटील भिलवंडे, रामतिर्थ पोलिस ठाण्याचे सपोनि संकेत दिघे, रामचंद्र भरांडे यांनी आण्णाभाऊच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. 

 

   यावेळी जयंती मंडळाच्या वतीने सेवानिवृत्त सैनिक बालाजी माधवराव सुर्यतळ, प्रभु हबर्डे, दिगांबर माली पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
 या कार्यक्रमासाठी नरसी ग्राम पंचायतचे सरपंच गजानन पाटील भिलवंडे,पोलिस पाटील ईब्राहीम बेग पटेल, गंगाधर वडगावे,बालाजी मामा गंगासागरे, होटाळकर पाटील, श्याम चोंडे, माधव कोरे, सह गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची भव्य दिव्य अशी मिरवणूक जुने गावातून नरसीतील मुख्य चौकात काढण्यात आली होती. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पञकार मारोती सुर्यवंशी, खाकीबा सुर्यवंशी, जळबा सुर्यवंशी, लालबा सूर्यवंशी, देवीदास सुर्यवंशी, सदाशिव सुर्यवंशी, रमाकांत सुर्यवंशी, राजु सुर्यवंशी, दिनेश सुर्यवंशी, सम्रत सुर्यवंशी, संतोष कुडके,रमेश एडके,यादव वाघमारे, यांनी परीश्रम घेतले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून रामतिर्थ पोलिस ठाण्याचे सपोनि संकेत दिघे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या