लाठ ( खु.) येथील जिल्हा परिषद शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्यांच्या सादरीकरणाने श्रोते मंत्रमुग्ध.

[ कंधार. दि. ६ वार्ताहर ]
 भारतीय ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाठ ( खु) ता.कंधार येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा., अभ्यासा वरील ताण कमी व्हावा म्हणून विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . चिमुकल्यांनी विविध गाण्यावरील सादरीकरणामुळे श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हानमंत लक्ष्मण इंगोले ( अध्यक्ष शा.व्य.स.लाठ खु.) , हे होते. तर उध्दघाटक म्हणून कर्तव्यदक्ष वसंत मेटकर ( शिक्षण विस्तार अधिकारी पं सं. कंधार ) ,व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ,व मुख्याध्यापक जयवंतराव काळे , तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष पाटील गवारे,सरपंच सौ. गंगाबाई पैलपार , उपसरपंच मनोज शिरसे, चेअरमन दत्तात्रय घोरबांड , तंटामुक्ती अध्यक्ष विनायकराव इंगोले , पोलिस पाटील अशोक कानगुले , हे होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता ,माता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेची पूजा करून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सुंदर गीताने स्वागत करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमात पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता. लहान मुलांनी , मुलींनी देशभक्ती व हिंदी गीतावर आकर्षक आणि उत्कृष्ट नृत्य सादर करून नागरिकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. भक्ती गीते देशभक्तीपर गीते, भारुड, पोवाडा , वैयक्तिक गीते, नाटकं ,चित्रपटातील गीते शालेय विद्यार्थी यांनी सुंदर असं सादरीकरण केले.
बालकलाकारांना शाळेचे मुख्याध्यापक डि .गादेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ताटे ,चक्रवार , उदबुके , कांदे , सौ.कुलकर्णी. सौ. मोधे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुरेख भारदस्त असे समालोचन श्री ताटे सर, यांनी केले, तर आभार प्रदर्शन विठ्ठलराव कऊटकर यांनी मानले. गावातील महिला ,पुरुष , तरूणी तरूणांनी पाहण्यासाठी गर्दी केली व चिमुकल्यांच्या सादरीकरणाचे टाळ्या वाजवून कौतुक केले.
WWW.MASSMAHARASHTRA.COM 

ताज्या बातम्या