तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आंतरभारती विद्यालयाचे यश 

(कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे)
      छत्रपती शिवाजी हायस्कूल सगरोळी येथे 9 डिसेंबर रोजी 17 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये आंतरभारती माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे..
त्यामध्ये अनुक्रमे थाळीफेक स्पर्धेत शेख मुदसिर प्रथम तर 100 मीटर धावणे स्पर्धेत मुलींमध्ये गीतांजली अंजनीकर द्वितीय व 400 मीटर धावणे स्पर्धेत निकिता शिकारे तृतीय क्रमांक पटकावले. सदरील विद्यार्थ्यानी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आमदार गंगाधररावजी पटणे, उपाध्यक्ष नंदाबाई पटणे, सचिव चंद्रशेखर पाटील, सहसचिव तथा विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती जयमाला पटणे, साने गुरुजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विठ्ठल चंदनकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
तर विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना सहशिक्षक बालाजी पोरडवार, विजय गायकवाड, माधव मोरे, लालू मदनुरे, विजयकुमार येमेकर, नागठाणे सर, पद्मावती शिळेकर, विजया कदम आदींनी मार्गदर्शन केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या