अंतरवाली पोलीस लाठीचार्ज घटनेचा बिलोलीत निषेध ; बिलोलीत सकल मराठा समाजाचा आक्रोश तहसिलदार याना निवेदन !

[ बिलोली प्रतिनिधी – सुनिल जेठे ]
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे या प्रलंबित मागणीसाठी अंतरवाली (सराटी) ता. अंबड जि. जालना येथे शांततेच्या मार्गाने जे उपोषण चालु होते. त्या उपोषण स्थळी पोलीसानी मराठा समाज बांधवार केलेल्या लाठी हल्लाचा बिलोली तालुका सकल मराठा समाजाच्या वतिने सरकारचा व पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी गेल्या तिन ते चार दिवसापासून शांततेच्या मार्गाने मौ.अंतरवाली ता.अबंड जि.जालना येथे चालु आसलेले उपोषण पोलीस बळाचा वापर करून उपोषणकर्त्याना समर्थन देणाऱ्या व मराठा समाजातील महीला व पुरुष बांधवावर अमानुष पणे लाठी हल्ला करून उपोषण उधळून लावण्याचा प्रयत्न झाला.यात अनेक महिला व पुरुष गंभीर जखमी झालेले आहेत.
या घटनेच्या निषेधार्थ बिलोली तालुका सकल मराठा समाजाच्या वतिने आज दि. ०२ सप्टेंबर रोजी तहसिलदार याना निवेदन देऊन जाहिर निषेध करण्यात आले. यावेळी सरकार व पोलीस प्रशासनाच्या विरोधात तिव्र शब्दात निषेधार्त घोषणाबाजी करण्यात आली व या घटनेतील सबंधीत दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन निलंबित करावे. अशी मागणी करण्यात आली. अन्यथा येत्या काळात तिव्र अंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला.
यावेळी राजु पा.शिंपाळकर ,दिलीप पा.पांढरे पांडुरंग पा.रामपुरे , दत्ता शिंदे, केदार ढगे, साहेबराव पा.शिंदे, संतोष पा.आगळे, गंगाधर पा.नरवाडे, तिरुपती हिवराळे, शंकरराव मावलगे, सयाराम निदाने, चक्रधर पा.टेकाळे, हाणमंत पा.कदम, विकास पा.जाधव, देवराव शिंदे, मारोती मालुसरे, शिवाजी शिंदे, गणपतराव पा.दौलापुरकर, नामदेव पाटील, व्यंकटराव शिंदे दुगावकर, साईनाथ रुद्रुरकर, आत्माराम देगावे, अरविद पा.शिंदे, रावसाहेब शिंदे, सुभाष जाधव, गंगाधर पवार यांच्यासह तालुक्यातील सकल मराठा बांधव व अन्य समाज बांधव मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या