विनाकारण फिरनाऱ्यांची अँटीजेन चाचणी ! !

(रायगड/म्हसळा ता.प्रतिनिधी-प्रा. अंगद कांबळे)
म्हसळा तालुक्यातील कोरोना संसर्ग वाढत असताना रोज रुग्ण आढळत आहेत. तरी म्हसळा शहरात विनाकारण फिरणाऱ्या बहादूराची संख्या मात्र जास्त.
विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस व नगरपंचायत च्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. अँटीजेन टेस्ट करून या मध्ये जे पॉझिटिव्ह आल्यास त्यांची रवानगी रुग्णालयात करण्यात येत आहे.
या कारवाईकरिता नगर पंचायत चे कर्मचारी प्रशांत करडे आरोग्य विभागाचे कर्मचारी राजेश म्हशीलकर,ट्राफिक हवालदार सरकटे व त्यांचे सहकारी तसेच आशासेवीका यांनी टेस्ट करण्याचे काम केले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या