कुंटूर प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटीजन टेस्ट सुरू ; लस ही उपलब्ध. नागरिकांनी कोरोनाची टेस्ट करून घ्यावी. सावधगिरी बाळगण्याचा डॉक्टरचा इशारा !

[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
 नायगाव तालुक्यातील कुंटूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सर्व नागरिकांनी कोविड विषयी जागरूकता बाळगणे तसेच पोस्टीक आहार ,घेणे अँटीजंन टेस्ट सुरू करण्यात आलेली असून संशयित व्यक्तींनी टेस्ट करून घेऊन कोरोनाविषयक नियम पाळावे ,मास चा नियमित वापरावे सॅनिटायझर सोबत ठेवावे अशी माहिती डॉ. वैद्यकीय अधिकारी काशिनाथ सोनवणे प्राथमिक आरोग्य केंद्र कुंटूर यांनी दिली आहे . 
सध्या ग्रामीण भागापासून ते शहरी भागामध्ये विविध प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन होत असतानाच सध्या राज्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याचे माहिती व चर्चा होत असतानाच ग्रामीण भागातही आरोग्य विभाग जागृत झाला असून वैद्यकीय अधिकारी यांनी परिसरातील सर्व नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला असून वेळोवेळी टेस्ट करून सर्दी खोकला ताप, त्यांनी टेस्ट करून उपचार घ्यावा मास व सॅनिटायझरचा नियमित वापर करावा पोष्टीक आहार घ्यावा पाणी उकळून पीवावे व शक्यतो गरम पदार्थ खावे असे आवाहन डॉ. काशिनाथ सोनवणे यांनी केले आहे.
    त्यामुळे कोरोना चा प्रसार होणार नाही व नागरिकांना पुढील कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही अशी माहिती डा. काशिनाथ सोनवणे यांनी दिली असून कुंटूर येथे दररोज ते येऊन नागरिकांची तपासणी करत आहेत व वेळोवेळी कॅम्प घेऊन नागरिकांचा चौकशी करत आहेत त्यामुळे नागरिकांना कसल्याच प्रकारची भीती बाळगण्याची गरज नाही आणि वेळेवर तपासणी केले नंतर औषध उपचार घ्यावे अशी माहितीही डॉ. सोनवणे यांनी दिली आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या