देगलूर बिलोली विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीकडून प्रा. सौ.अनुराधा गंधारे (दाचावार) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला !

“एकच ध्यास देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचा विकास असा नारा सौ.अनुराधा गंधारे यांनी हजारोंच्या सभेत दिला.”
(बिलोली प्र – सनिल जेठे)
90 देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी होऊ घालेले महाराष्ट्र विकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार म्हणून प्रा.सौ. अनुराधा गंधारे(दाचावार) यांनी जनशक्तीच्या जोरावर उमेदवारी अर्ज दि.२९ आक्टोंबर रोजी देगलूर येथील तहसील कार्यालयात दाखल केला.

सर्व महाराष्ट्रात देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ हा विकासापासून कोसोदुर असलेला मतदारसंघ म्हणून प्रसिद्ध आहे, आजी-माजी आमदारांनी ज्याप्रमाणे मतदारसंघात विकास कामे व सर्व सामान्य नागरिकांसाठी रोजगार मिळवून देण्यासाठी प्रकल्प आणला नाही.

विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळेल असे कॉलेज – शाळा व शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न आजवर सोडवू शकले नाहीत, म्हणून महाराष्ट्र विकास आघाडीचे उच्चशिक्षित महिला उमेदवार प्रा.सौ.अनुराधा गंधारे (दाचावार) यांनी घेतलेल्या सभेत कार्यक्रमात या मतदारसंघातील बिलोली हे शहर नायगाव पेक्षा कितीतरी पटीने विकासात मागे आहे, माझ्यावर विश्वास ठेऊन मला मतदान करुन आशिर्वाद दिला तर नक्कीच नायगाव पेक्षा बिलोली शहराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन उपस्थित महिला, नागरिकांपढे केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या