कृषी उत्पन्न बाजार समिती बिलोली संचालक मंडळाच्या निवडणूकीत शेतकरी विकास पॕनलच्या १८ पैकी १७ उमेदवाराचा भरघोस मताने विजयी

“रवि पटील ,खतगावकर २२३ मते घेऊन विजय झाल्याने कार्यकर्तेचा जल्लोश”…..

[ बिलोली ता.प्र – सुनिल जेठे ]
कृषी उत्पन्न बाजार समिती बिलोली संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली असता दि.८ आॕक्टोबर २०२३ रोजी निकाल जाहीर झाला त्यात महाविकास अघाडी शेतकरी विकास पॕनलच्या उमेदवारांना मतदारांनी कौल देऊन भरघोस मतानी निवडून दिले असल्यामुळे बिलोली शहरात विजयी उमेदवांचा जल्लोश करतांना दिसुन आले.

सदरिल कृषी उत्पन्न बाजार समिती बिलोली संचालक मंडळ निवडणूक सन २०२३ ते२०२८ करिता भारतीय जनता पार्टी तर दुसरिकडून महाविकास अघाडीचा व शेतकरी विकास पॕनल उमेदवारांनी महाराष्ट्राचे माजी मुख्य मंञी मा.अशोकराव चव्हाण आणि माजी खाजदार मा.भास्करराव पाटील खतगावकर,आमदार मा.जितेश आंतापूरकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूकीच्या रिंगनात उतरले असता मतदारांनी महाविकास आघाडी व शिवसेना श्री. उदव ठाकरे गटाच्या संयुक्त शेतकरी विकास पॕनच्या उमेदवारांना कौल देऊन १८ पैकी १७ उमेदवारांना निवडून दिले. 
 या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत निवडून आलेले विजयी उमेदवारामध्ये ग्राम.पं.सर्वसाधारण -पाटील रविकूमार प्रभाकरराव मौ.खतगावकर यांनी २२३ मते घेऊन विजय झाले तर सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मधुन पाटील शिवाजी शेटीबा मौ. पाचपिंपळीकर ता.बिलोली यांना १९९ मते,पाटील राजेंद्र सोमशंकर मौ. कार्ला बू.यांना १९५ मते,बामणे शिवकुमार धर्मप्रकाश सगरोळी यांना १९५ मते,शिनगारे अंबादास संतुकराव मौजे थडी सावळी यांना १९० मते ,पाटील हणमंतराव लक्ष्मणनराव बेळकोणी बू.यांना १८७ मते,शिवपनोर परमेश्वर मारोतीराव मौ.बोळेगाव यांना १८३ मते ,पाटील आनंदराव गुंडप्पा मौ.मिनकी यांना १८२ मते,सेवा.स.सं.महिला राखीव मधुन सौ.यंकम सुरेखा शंकर मौ.डोणगाव बू.यांना १९९ मते, गज्जलवाड चंद्रकलाबाई यंकटराव यांना १९३ मते,ई.मा.बुद्देवाड राजेश्वर रामकिशन बेळकोणी बु.यांना १९९ मते,वि.जा./भ.ज.- नाईक मारोतीराव गोविंदराव मौ.गळेगाव यांना १९६ मते,ग्राम.पं.सर्वसाधारण -कोरनुळे यादव किशनराव मौ.लोहगाव यांना १६७ मते, ग्राम.पं.आ.दु.घ.जाधव श्रीराम सिताराम मौ.दगडापूर यांना २०८ मते ,ग्राम.पं.अनु.जा.ज.-तरटे भास्कर नागोराव मौ.केरुर यांना १९४ मते,आडत /व्यापारी -रायकंठवार अनुदत्त विठ्ठल रा.बिलोली यांना ५२ मते, देशमुख शिवशंकर बाबूराव रा.बिलोली यांना ४७ मते, घेऊन निवडून आलेले चित्र बिलोली शहरात दिसुन येत होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या