बाजार समिती निवडणुकीत अशोक कदम विजयी !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
              येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अशोक कदम नागापूरकर हे बहुमताने विजयी झाले असून त्यांचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
              एका लहान खेडेगावात शेतकऱ्यांच्या घरी जन्म घेऊन घरात कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आपल्या जिद्द,चिकाटीच्या जोरावर व मा.खा. भास्कररावजी पाटील खतगावकर यांच्या मार्गदर्शनाने नांदेड जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अशोक पाटील नागापूरकर यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात 2007 साली अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुका उपअध्यक्ष पद भूषवून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली.
पुढे 2008 साली युवक काँग्रेसचे बिलोली तालुका अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्याची दखल जनतेने घेऊन 2010 मध्ये कोंडलापूर,नागापूर, सुलतानपूर गट ग्रामपंचायतचे बिनविरोध सरपंच पदाचा बहुमान दिले.तद्नंतर कुंडलवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे बिगर कर्जदारातून 2011 साली संचालक म्हणून काम पाहिले, पंचायत समिती आरळी गणातून 2012 मध्ये सदस्याचे निवडणूक जिंकले.
कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय संचालक म्हणून माननीय खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर 2018 साली निवड केली, आता पुन्हा नुकत्याच झालेल्या कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीत विरोधकांचा दणदणीत पराभव करुन विजय मिळविला असून विजयाची परंपरा कायम ठेवली आहे. अशा विविध पदावर राहून आपल्या कामाची छाप दाखवत प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी राहून सामाजिक बांधिलकीची जपणूक त्यांनी आपल्या कार्यातून करून दाखवली आहे.त्यांच्या या कार्याचे तालुक्यात कौतुक होत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या