कुंडलवाडी बाजार समिती निवडणुकीत 35 उमेदवार रिंगणात ; महाविकास आघाडीचे दोन उमेदवार बिनविरोध  

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
         येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत असून या निवडणुकीत 35 उमेदवार रिंगणात तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार बिनविरोध आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जी आर कोरवाड यांनी दिली आहे.
          कुंडलवाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची होत असून या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीच्या पॅनलने आपआपले उमेदवार उभे केले आहेत,या निवडणुकीमध्ये एकूण 94 अर्ज दाखल झाले होते त्यापैकी सात अर्ज अवैध ठरले तर अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी 47 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतली आहे तर प्रत्यक्ष रिंगणात 35 उमेदवार उतरले आहेत.
त्यामध्ये सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघ यंबडवार सुनील, कदम अशोक, कोत्तावार धोंडूराम, खरबाळे गंगाधर, चंदनकर शिवाजी,चंदनकर संतोष, जाधव सिद्राम, जोशी अतुल, नरवाडे विठ्ठल,नरवाडे श्रीनिवास, भाले बाबाराव, इरकलवाड राजेंद्र, लखमपुरे हनमंत, शिंदे आनंदराव, सेवा सहकारी संस्था महिला राखीव मतदारसंघ ढगे देवणबाई, नरवाडे नर्मदाबाई, बोधने गोदावरीबाई, हिवराळे वत्सल्लाबाई, सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदार संघ बोडके गंगाधर, मोहमद खय्युम,सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघ मेहत्रे कोंडीबा, म्याकलवार पंचफुला, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ पण कनशेट्टे हनमंत, नरवाडे माधव,शिंदे पंडित, शिंदे साहेबराव, शेख फारूक,हिवराळे अंकुश, हिवराळे रंजीत, ग्रामपंचायत अनुजाती जमाती मतदारसंघ पतंगे सिद्धार्थ,वाघमारे गणपत,ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक मतदार संघ साईनाथ निवळे,हिवराळे माधव, हमाल मापाडी मतदारसंघ जायेवार मारोती, वारेवार शंकर आदीं उमेदवार रिंगणात आहेत तर आडत व व्यापारी मतदार संघात महाविकास आघाडीचे राजेश्वर उत्तरवार,रमेश दाचावार यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे महाविकास आघाडीला विजयाचा आत्मविश्वास वाढला आहे.
          या निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेतृत्व माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर तर महायुती कडून माजी आमदार सुभाष साबणे,माजी जी प सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांनी करीत आहेत ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली असून. निवडणुकीत कमी मतदार संख्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होण्याची दाट शक्यता आहे.यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून जी आर कोरवाड हे काम पाहत आहेत..
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या