कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकिसाठी 94 अर्ज दाखल !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
      येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागेसाठी निवडणूक जाहीर झाली असून,अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 61 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहे तर या निवडणुकीत एकूण 94 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहे.
      त्यामध्ये सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघ 35, सेवा सहकारी संस्था महिला राखीव मतदारसंघ 08, सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदार संघ 06, सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघ 03, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ 15, ग्रामपंचायत अनुजाती जमाती मतदारसंघ 10, ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 04, अडत व व्यापारी मतदारसंघ 09,हमाल मापारी मतदारसंघ 04 आशा विविध मतदारसंघात एकूण 94 उमेदवारांनी आपले नाम निर्देशनपत्र दाखल केले आहे. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून आर जी कोरवार यांनी काम पाहिले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या