राज्य महामार्गावर सीसी रोड व सी सी.नालीचे बांधकाम करण्यासाठी नागरिकांचे निवेदन !

[ कुंडलवाडी- अमरनाथ कांबळे ]
    सध्या कुंडलवाडी ते धर्माबाद राज्य महामार्ग क्रमांक 223 चे काम सुरू असून धर्माबाद रोडवर असलेल्या साठे नगर व आंबेडकर नगर भागात सीसी रोड व सीसी नालीचे बांधकाम गुत्तेदाराकडून करण्यात येत नसल्याने या भागातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, उपजिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय,मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
      कुंडलवाडी ते धर्माबाद राज्य महामार्ग क्रमांक 223 चे सध्या काम सुरू असून या मार्गावर चुंगी नाका ते कुंडलवाडी नवीन बसस्थानकापर्यंत सी.सी.नालीचे बांधकाम सुरू आहे.पण पुढे साठे नगर व आंबेडकर नगर भागात सीसी रोड व सीसी नालीचे बांधकाम करण्यात येत नाही. या भागात सीसी रोड व सीसीनालीचे बांधकाम ३३ के.व्ही.पर्यंत करण्यात यावे. यासाठी या भागातील शेकडो नागरिकांनी कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर, उपविभागीय अधिकारी बिलोली, तहसीलदार बिलोली व नगरपालिका मुख्याधिकारी कुंडलवाडी यांना निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनावर साईनाथ गांजरे किरण नागणीकर,जयराज कंपाळे,माधव वाघमारे,यादव वाघमारे,गजानन कंपाळे संतोष कंपाळे,नवज्योत कंपाळे संतोष भोसले यांच्यासह शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या