बेरोजगार स्वयंरोजगार सेवा संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी, शेख वल्लीसाब यांची निवड !

[ प्रतिनिधी – दीपक गजभारे घुंगराळेकर ]
बेरोजगार स्वयंरोजगार सेवा संस्था संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी घुंगराळा, येथील शेख वल्लीसाब नवाजसाब यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौतमदादा भद्रे यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. शेख वल्लीसाब यांचे राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक चळवळीतील कार्याची दखल घेऊन बेरोजगार स्वयंरोजगार सेवा संस्था संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यावेळी महिला जिल्हाध्यक्षा सौ.किरण यशवंतकर, जिल्हा सचिव नागराज ढवळे, शेख महेबूब बाबुमियाँ, उपाध्यक्ष किशन वरपडे, दत्ता मोहिते, महासचिव यशवंत थोरात, संघटक शेखर पंतुलवार, कोषाध्यक्ष सादिक सय्यद, सदस्य शिवाजी भालेराव, सुजीत पोहरे, जग्गू नाईक, परशुराम कदम यांची उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या