अर्जापुर येथे पांदण रस्ता दुरुस्तीचे भूमिपूजन !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
        येथून 3 की मी अंतरावर असलेल्या मौजे अर्जापूर येथील पांदण रस्ताच्या दोन्ही बाजूने काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली व रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी येणे जाणे करण्यासाठी मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत होते,या अनुषंगाने येथील ग्राम पंचायत सदस्य साईनाथ शेट्टीवार,इम्तियाज शेख,माजी सदस्य गौराजी शेट्टीवार,भूमन्ना हिंगणे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांच्याकडे पांदण रास्ता दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला होता,यांच्या या मागणीला माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांनी स्वतः च्या स्वखर्चातून पांदण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी दिला असून या रस्त्याचे भूमिपूजन दिनांक 12 रोजी कासराळीचे माजी सरपंच अरविंद ठक्करवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे.
            यावेळी माजी सरपंच धर्माजी शेट्टीवार,धर्माजी वडेन्ना शेट्टीवार,पंढरी कुशोड, प्रा सायलू शेट्टीवार,नरसिंग शेट्टीवार,रमेश शेट्टीवार,बाबुराव हिंगणे, ज्ञानेशेवर मेडेकर,इम्तियाज शेख, गौराजी शेट्टीवार,मोहन मेडेकर,मोतीराम जाधव वेंकट जाधव,ताजुदिन शेख,सायलू शेट्टीवार,भूमन्ना हिंगणे,यादव शेट्टीवार,आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या