कुंडलवाडी येथील बैल चोरीतील आरोपींना अटक !

[ कुंडलवाडी – विशेष प्रतिनिधी- अमरनाथ कांबळे ]
           येथील पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मौजे का-हाळ येथील शेतक-यांचे एक बैल जोडी दिनांक 16 व 17 आँगस्टच्या मध्यरात्री चोरी झाल्याची तक्रार कुंडलवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.या तक्रारीच्या तपासाअंती चार आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती सपोनि सुरेश मांटे यांनी दिली.
       कुंडलवाडी पासून जवळच असलेल्या मौजे का-हाळ येथील शेतकरी मधूकर नागनाथ वजीरे यांच्या शेतातील एक बैल जोडी चोरी झाल्याची फिर्याद देण्यात आली होती, फिर्यादी मधूकर वजीरे यांच्या फिर्यादीवरून दिनांक 17 ऑगस्ट रोजी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात  गु.रं.नं.94/2021- 379 भादवी नुसार अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संबंधीत गुन्हा्याचा तपास करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी व सपोनि कुंडलवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी यांचे पथक नेमण्यात आले होते,या पथकाने आरोपीचा शोध घेऊन आरोपी तुकाराम रूकमाजी गंगोने वय ४० वर्ष रा कुंडलवाडी,काशीनाथ गंगाधर गटूवार वय ३२ वर्ष रा.कुंडलवाडी, दाऊ गंगाराम डूकरे वय ३८ वर्ष रा.का-हाऴ,आनंदा ग्यानोबा खटके वय ५० वर्ष रा.का-हाळ या चार आरोपींना अटक केले तर एक आरोपी फरार आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशीअंती आरोपींनी गाडी एम.एच.२६ डी.ई.५६३२ अशोका लिलँड या कंपीनीच्या पीकअप गाडीने चोरीतील मुद्देमाल तेलंगना राज्यातील बासवाडा जवळील देशीपेट येथे नेऊन ठेवल्याची कबूली आरोपीने दिले आहे.
तसेच आरोपीकडील चोरीतील मुद्देमाल हस्तगत करुन संबंधित फिर्यादीला देण्यात आले आहे. तसेच याअगोदर ही शहर व परिसरात झालेल्या जनावारांच्या चोरीचे तपास लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या गुन्ह्याचा पूढील तपास धर्माबादचे उपविगागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड व सपोनी सुरेश मांन्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी हे करीत आहेत.
 www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या