जीवन जगण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे – कमांडर संतोष कल्लेवार 

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
       येथील विजय पटणे मेमोरियल स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला,विद्यार्थ्यांनी जीवन जगण्याचे कौशल्य आत्मसात करून एक आदर्श नागरिक म्हणून जीवन घडवावे असे प्रतिपादन उपस्थित विद्यार्थ्यांना सैनिकी विद्यालय सगरोळीचे असिस्टंट कमांडर संतोष कल्लेवार यांनी केले आहे…
        आंतरभारती शिक्षण संस्था संचलित आंतरभारती माध्यमिक विद्यालय व विजय पटने मेमोरियल स्कूल या शाळेच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम विजय पटणे मेमोरीयल स्कूलच्या प्रांगणात पार पडला. यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार गंगाधररावजी पटने तर प्रमुख पाहुणे म्हणून कमांडर संतोष कल्लेवार, उपाध्यक्ष नंदाताई पटने,सचिव चंद्रशेखर पाटील सावळीकर,सहसचिव तथा मुख्याध्यापिका जयमाला पटने, मुख्याध्यापक विठ्ठल चंदनकर, प्रभुनाथ गंगुलवार आदी उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून कमांडर संतोष कल्लेवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मनोगत व्यक्त करताना असे प्रतिपादन केले की, विद्यार्थ्यांनी कुठल्याही संकटाला न घाबरता त्या संकटाला जिद्दीने सामोरे जावे गेले पाहिजे, या कोमार्य अवस्थेच्या वयात विद्यार्थ्यांनी एखादी गोष्ट ठरवली ते करून दाखवण्याची शक्ती तुमच्या दडली आहे.
तसेच आपल्या आई-वडिलांचा आदर करणारे एक संस्कारी विद्यार्थी बनले पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना ज्यात आवड आहे ते क्षेत्र निवडून निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करा नक्की यश संपादन कराल. कॉफी करून मार्क मिळवण्याचा मागे लागू नका तर जीवन जगण्याचे कौशल्य आत्मसात करा असे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. 
          यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले शालेय अनुभव आपल्या मनोगत व्यक्त केले आहे तर आंतर भारती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लिहलेल्या ‘मयुरपंख’ या हस्तपुस्तिकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजयकुमार येमेकर तर आभार अमरनाथ कांबळे यांनी मानले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या