नवी मुंबई, ३ – करोनाच्या अचानक उद्भवलेल्या संकटाने आपण सारेच भांबावून गेलो आहोत. हे संकट केवळ आपल्यालाच नव्हे तर जगातील आखिल मानव जातीला हलवून ठेवणार होते हेे सिध्द झाले आहे. फार पूर्वी प्लेग, काँलरा, हैजा यासारख्या रोगांच्या साथी आल्या व सर्व मानवजlतीला हादरवून गेेल्या. किडा,मुंगी मरावी तशी म्हणे माणसं मरत होती. तशीच काहीशी परिस्थिती आताही आहे. कारखाने, कंपन्या, आँफिसेस व छोटे मोठे उद्योग बंद पडले, हातावर पोट असलेली माणसे उपासमारीने हवालदिल झाली आहेत, हतबल झाली आहेत.
पण या सगळ्या गढूळ व निराशाजनक वातावरणात मात्र काही ठिकाणी माणूसकीचा निर्मळ झराही पहायला मिळाला. चतुरस्त्र अभिनेत्री नयन पवार यांनी मात्र आपला मदतीचा हात पूढे करून नेरुळ मधील डी मार्ट येथील सफाई कर्मचारी, माळी काम करणारे, कारकून व इतर अनेक गरजवंतांना धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करून आपला माणूसकीचा धर्म पाळला. त्यासाठी आज अभिनेत्री नयन पवार यांचे भरभरून कौतुक करण्यात आले. यावेळी “अरविंदो मिरा” संस्थेच्या सचीव श्रीमती मानसी राऊत, खजिनदार श्रीमती धनश्री साखरकर, समाजसेवक रत्नाकर खानविलकर हे उपस्थित होते. www.massmaharashtra.com
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy