श्री नगरेश्वर वैश्य मंदिर नांदेड यांच्या प्रयत्नातून 51 आर्य वैश्य उपवर उपवधू परिचय मेळावा नांदेड येथील गुंडेगावकर मंगल कार्यालय यांच्या भव्य दिव्य प्रांगणात प्रमुख मान्यवर पदाधिकारी व हजारोंच्या आर्य वैश्य समाज बांधवांच्या उपस्थितीत थाटात झाला.
आर्य वैश्य उपवर अपवधू मेळाव्याच्या भव्य दिव्य सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष व काशी अन्नपूर्णा सत्रमचे उपाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमारजी गादेवार. सौ राजश्री गादेवार, प्रमुख पाहुणे महाराष्ट्र आर्य वैश्य दिलीपभाऊ कंदकुर्ते, दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदचे उपकार्यकारी अधिकारी मुक्कावार हे होते तर प्रमुख अतिथी सुभाषराव कन्नावार, अनिल मनाठकर. एकनाथराव कांबळे, सुधीर पाटील, मेळावा प्रमुख योगेश मोगडपल्ली, नगरेश्वरचे अध्यक्ष भागवत गंगमवार, सेक्रेटरी सुरेश कोडगिरे. उपाध्यक्ष बिपिन गादेवार. कोषाध्यक्ष पांडुरंग येरावार, स्मरणिकेचे प्रमुख भागवत लोकमनवार. धार्मिक प्रमुख गणेश गादेवार. प्रसिद्धी प्रमुख दिलीप बंडेवार.सदस्य शंतनू कोडगिरे, सदानंद मेडेवार, संतोष मुक्कावार. वासुदेव महाजन, सुनील कोडगिरे, बालाजी येरावार, अजय रुद्रकंठवार, पांडुरंग गादेवार, सुधीर बिडवई, विजयकुमार गबाळे, आनंद बिडवई. लक्ष्मीकांत बंडेवार, शशिकांत चौधरी. राज्य संघटक प्रमुख प्रदीप कोकडवार, राज्य प्रसिद्धी प्रमुख गजानन चौधरी आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कन्यका परमेश्वरी वासवी माता व ह भ प रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. तसेच प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नंदकुमारजी गादेवार म्हणाले की श्रीनगरेश्वर वैश्य मंदिर नांदेड च्या वतीने आज पर्यंत विविध समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन वधू वर परिचय मेळावा भव्य दिव्य आयोजित करून महाराष्ट्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे . समाज बांधवांचा वेळ पैसा परिश्रम वाया जाऊ नये म्हणून सर्व समाज एकत्र येऊन उपवर उपवधु परिचय मेळावे मोठ्या प्रमाणात घेतले जातात परंतु आज मेळावा घेतल्यानंतर आपला समाज सुशिक्षित व समजदार असताना लग्न जुळल्या नंतर काही प्रमाणात सहा महिन्याच्या आत घटस्फोटीचे प्रमाण सध्या वाढले असून हे सर्व काही आई-वडिलांनी मुला मुलीत गैरसमज करून देत असल्यामुळे घडत असल्याचे मत व्यक्त केले वधू वर परिचय मेळाव्यात येणाऱ्या सर्व समाज बांधवांना उत्कृष्ट शाही भोजन देण्यात आला तर काही समाज बांधवांनी चहा कॉफी दूध नाश्ता शीत पेय पाणी मोफत वाटप केले आयोजित केलेल्या मेळाव्यात महाराष्ट्र आंध्र कर्नाटक विदर्भ परिसरातील समाज बांधव मोठ्या प्रमाणात हजारांच्या सुखाने उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy