पायाभूत सुविधा व गुणवत्ता देण्यास माझे महाविद्यालय कटिबद्ध – अशोकराव चव्हाण

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
दि.9 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नव्यानेच अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्य पदी नियुक्त झालेले व धर्माबाद शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष मा. अशोकराव चव्हाण यानी धर्माबाद येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीस उपस्थिती लावली.

यादरम्यान आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरुन बोलताना अशोकराव चव्हाण असे म्हणाले की महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेले हे माझे लालबहादूर शास्त्री महाविद्यालय गुणवत्तेच्या जोरावर सातत्याने काम करीत आहे. परिसरातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी निश्चितच येणाऱ्या काळातील शिक्षण व्यवस्थेतील होणाऱ्या बदलानुसार परिसरातील विद्यार्थ्यांना पायाभूत शिक्षण आणि गुणवत्ता अधिका-अधिक कशी देता येईल. याकडे लक्ष देणारे माझे हे महाविद्यालय आहे महाविद्यालयाच्या विकासासाठी माझी संस्था, प्राचार्य, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी सदैव कार्यशील राहतील याची ग्वाही देत, महाविद्यालयाच्या विकासाची हमी यावेळी अशोकराव चव्हाण यांनी दिली तसेच आपल्या महाविद्यालयातील शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील मुला- मुलींची संख्या लक्षात घेता त्यांची सुरक्षितता व त्यांना मूलभूत व पायाभूत सुविधांची गरज वेळेत कशी पूर्ण केली जाईल याकडे लक्ष देण्याची सूचना महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संचालक मंडळ यांना दिली.
यावेळी महाविद्यालयातील विविध विकास कामाचे उद्घाटन,महाविद्यालयीन कर्मचारी सेवा सहकारी सोसायटीचे कार्यालय नव्याने बांधण्यासाठी नव्या इमारतीचे भूमिपूजन, महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्थेसाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्वतंत्र मुलींच्या उद्यानाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते करण्यात.
यानंतर महाविद्यालयातील सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्याशी सुसंवाद साधण्याचा कार्यक्रम तसेच मागील शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी विविध राष्ट्रीय व राज्य पातळीवरील विविध स्पर्धेत भाग घेत मानांकन प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याचा आणि सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर कणसे यांनी केले तर आपल्या प्रास्ताविकेत महाविद्यालयाच्या भौतिक व शैक्षणिक परिस्थितीबद्दल सविस्तर माहिती देत महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहुन कार्य करू असे मत मांडले.
यावेळी धर्माबाद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव चव्हाण उपाध्यक्ष गंगाधर गुजराती, सचिव डॉ. कमलकिशोर काकांनी, सहसचिव वर्णी नागभूषण, कोषाध्यक्ष महेंद्र कुमार पांडे, संचालक व्ही एन पाटील बन्नाळीकर,उमेश झंवर, नागनाथ नोमुलवार यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर कणसे उप प्राचार्य डॉ योगेश जोशी,उप प्राचार्य वसुंधरा पोहरे, ( क.म.) यासह महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रभाकर जाधव आणि आभार प्रा. डॉ. सुनीलचंद्र सोनकांबळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व सहकारी वृंद उस्फुर्तपने सहकार्य केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर कणसे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या