महाराष्ट्राचे राजकारण करीत असताना अनेक हेवेदावे होतात पण आमदार राजेश पवार यांनी नायगाव मतदार संघात जे विकास कामे केलीत ती विकासभिमुख आहेत. असा अभ्यासू आमदार महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहिला आहे, अशा विकास करणाऱ्या राजेश पवार यांना व लोकसभेला संतुका हंबर्डे यांना कमळाच्या निशाणीचे बटन दाबून महायुतीच्या उमेदवाराना प्रचंड मतानी विजयी करा. असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान राज्यसभेच खासदार अशोकराव चव्हाण यांनी उमरी भाजपा महायुती च्या जाहीर सभेत केले आहे.
या सभेला प्रमुख मार्गदर्शक अशोकराव चव्हाण, नायगाव विधानसभा उमेदवार राजेश संभाजी पवार, लोकसभा उमेदवार संतुका हंबर्डे याचे प्रतिनिधी सुनिल हंबर्डे, उद्योगपती मारोतराव कवळे गुरुजी, राजेश कुंटुरकर, माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, ॲड भाऊसाहेब देशमुख गोरठेकर, शासकीय गुतेदार संजीव सवई, डॉ विक्रम देशमुख, माजी नगराध्यक्ष विजुअप्पा उतरवार, बापुसाहेब पाटील कौडगावकर, प्रसिद्ध व्यापारी म खाज्यासेठ, सुभाष पेरेवार, श्रीनिवास अनंतवार, किशोर पबितवार, ज्ञानेश्वर पा कदम, अविनाश पा कदम, डॉ अमोल ढगे, नानू नाईक कवडीकर, शाहीर जन्टल, राजेश मनुरकर आदी मान्यवर उपस्थित होते .
प्रास्ताविक मध्ये संजय कुलकर्णी म्हणाले अशोकराव चव्हाण राजेश पवार, कवळे गुरुजी एकत्र आल्यास लोकसभा / विधान सभेचा विजय निश्चित झालाच पण जि.प, पं.स नगर परिषदेच्या निवडणुकीत कोणताही माईचा लाल विरोधात उतरला तरी विजयी होवू शकत नाही एवढी मोठी शक्ती आता निर्माण झाली आहे.
अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले ज्यांना दुधाचे दात फुटले नाहीत असे लोक छोट्याशा पदावर राहून उडया मारतात, मी महाराष्ट्राचे अनेक मोठी पदे मिळवून विकास केला आहे. माझ्या विरोधकांना अजुन सांगायचे आहे, “अशोकराव चव्हाण अभी जिंदा है” माझ्या मागे विकास आणि जनता आहे. माझ्या जीवावर आणि हिम्मतीवर निर्णय घेतला ते जनतेसाठीच. राजकारणात चढउतार हेवेदावे होत असतात. मोदींनी पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली त्यांचे कार्य निरंतर विकासाचे आहे. म्हणून मोदीजींवर विश्वास आहे. नांदेड जिल्हातील लोक स्वाभीमानी आहेत त्यांना विकासु नेतृत्व कळते. पुढे अशोकराव चव्हाण म्हणाले जिल्हात सोयरे धायरे, नाते गोते जपून मतदान करू नका. क्रास वोटिंग करू नका, नांदेड जिल्हातील नऊ विधानसभा आणि एक लोकसेभेचे महायुतीचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी करून मोदी सरकारचे हात बळकट करावे असे आवाहन केले.
आमदार राजेश पवार म्हणाले, माझ्या विरोधात प्रचार करणारी लोक विकासाच्या मुद्यावर फोकस न करता खोके घेवून वेगळा प्रचार करीत आहेत. मी सर्वच महापुरुषांचा विचारांचा आदर करून मतदार संघात कामे केली आहेत. गेल्या निवडणूकीत नेत्रदीपक विकासाची कामगिरी केली. त्यांचा लेखा जोखा मी सांगण्या पेक्षा जनतेसमोर माझा विकासाचा आरसा आहे.
आमदार राजेश पवार पुढे म्हणाले लग्न करण्यासाठी नवरदेव कसा आहे. त्यांची खानदान, संपत्ती तपासतो, नौकरीला आहे की नाही, तो बेकार आहे का हे पाहून तपासून मुलगी देतो. तस तुम्ही नायगावचा विकास केला की नाही? कोण करू शकतो? हे मतदारांनी तपासावे उग खोटे प्रचार करून पाडापाडी चे राजकारण करून दहशदवादी घुसघोरांना थारा देवू नका असा ही जोरदार प्रहार राजेश पवारांनी केला आहे.
कवळे गुरुजी यांनी माझे राजेश पवार यांचे कांही वैर आहे असे गैर समज करून न घेता महायुतीच्या दोन्ही उमेदवाराना निवडणून द्या असे ठणकावून सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश मनुरकर तर आभार ज्ञानेश्वर कदम यांनी केले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy