कुंडलवाडी येथे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची 5 ऑक्‍टोबर रोजी जाहीर सभा !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
बिलोली -देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषगाणे महाविकास आघाडीची जाहीर सभा दिनांक 5 रोजी सकाळी 11:30 वाजता मुख्य बाजार पेठ कुंडलवाडी येथे आयोजित केलेआहे.
या सभेला सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर, शिवसेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश मुंडे, आमदार अमरनाथ राजूरकर, मोहन अण्णा हंबर्डे, माजी आमदार वसंतराव चव्हाण आदींसह अनेक महाविकास आघाडीचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या सभेला शहर व परिसरातील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका काँग्रेस अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर यांनी केले आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या