कु.अस्मिता बैलकवाड हिचा शिष्यवृत्ती परीक्षेत जि.प.शाळेतून प्रथम क्रमांक !

( नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी )

नायगाव केंद्रातून 2021-22 पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा नुकताच संपन्न झालेल्या निकालात जिल्हा परिषद शाळा शेळगाव छत्री येथील कुमारी अस्मिता शिवलिंग बैलकवाड ही प्रथम क्रमांकावर पात्र ठरली आहे.

नायगाव केंद्रातून शेळगाव छत्री, बैठकबिलोली व अन्य गावच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनीने 2021. 22 मधील पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सहभागी झाले होते या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून या परीक्षेत शेळगाव छत्री येथील जिल्हा परिषद शाळेतील कुमारी अस्मिता शिवलिंग बैलकवाड ही विद्यार्थिनी सदर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एस एस बच्चेवार, सौ.एम.पी. जाधव, व्ही के रामलोड, यु एस बाराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर परीक्षेत प्रथम क्रमांकावर पात्र ठरली असल्यामुळे शेळगाव छत्रीचे युवानेते संजय पाटील चोंडे, सरपंच जळबा वाघमारे, उपसरपंच बालाजी सालेगाये, तंटामुक्ती अध्यक्ष माधव बैलकवाड, शालेय समिती अध्यक्ष सुरेश सालेगाये, माजी सरपंच संजय पा.अनेराये, ज्येष्ठ नागरिक पुंडलिक पाटील अनेराये, माधव एजेंपवाड, दिलीप निलावार आधी जणांनी कुमारी अस्मिता बैलकवाड हिचे तोंड भरून कौतुक करून अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या