कुंडलवाडी येथे सहायक पोलिस निरीक्षक दिपक मस्के रुजू !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी- अमरनाथ कांबळे ]
येथील पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक संतोष शेकडे यांची बदली स्थानिक गुन्हे शाखा नांदेड येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी अर्धापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिपक मस्के यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिनांक 8 रोजी काढले होते,त्या अनुषंगाने दिनांक 8 रोजीच रात्री 10 वाजता दिपक मस्के यांनी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात रुजू होऊन ठाण्याच्या कारभार हाती घेतला आहे..
नव्याने रुजू झालेल्या साह्यक पोलीस निरीक्षका समोर अनेक आव्हाने आहेत, त्यामध्ये शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात फोफावलेल्या अवैध धंदे बंद करणे, रात्रीच्या वेळी अवैध रित्या वाळू उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांवर कार्यवाही करणे,शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे,आदी असले तरी शहर व परिसरातील अवैध धंदे व वाळू माफियांवर लगाम घालून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करतील की त्यांना अभय देतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.असे असले तरी य सपोनी दिपक मस्के हे रुजू झाल्याबद्दल त्यांचे पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, पोलीस कर्मचारी आदीसह नागरिकांनी स्वागत केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या