कुंडलवाडी येथे सहायक पोलिस निरीक्षक संतोष शेकडे रुजू  !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
       येथील पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत कासले यांची प्रशासकीय बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी मनाठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष शेकडे यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिनांक 11 रोजी काढले होते,त्या अनुषंगाने दिनांक 2 फेब्रुवारी रोजी संतोष शेकडे यांनी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात रुजू होऊन ठाण्याच्या कारभार हाती घेतला आहे.

           नव्याने रुजू झालेल्या साह्यक पोलीस निरीक्षका समोर अनेक आव्हाने आहेत,त्यामध्ये शहर व परिसरातील अवैध धंदे बंद करणे, अवैध वाळू माफियांवर कार्यवाही करणे,शहरात झालेल्या अनेक चोरीच्या घटनेच्या तपास करणे,आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आदी आव्हाने असले तरी शहर व परिसरातील अवैध धंदे व वाळू माफियांवर लगाम घालून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करतील की त्यांना अभय देतील हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

असे असले तरी येथील ठाण्यात सपोनी संतोष शेकडे हे रुजू झाल्याबद्दल त्यांचे पोलीस कर्मचारी व नागरिकांनी स्वागत केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या