कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत कासले यांची बदली !

संतोष शेकडे नवे सहायक पोलिस निरीक्षक !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
       येथील पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत कासले यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी मनाठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष शेकडे यांची नियुक्ती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी काढले आहेत.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील अधिनियम क्रमांक २२ च्या कलम दोन ची सुधारणा महाराष्ट्र पोलीस सुधारणा अधिनियम २०१५ मधील सुधारित तरतुदी सर्व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील अधिक क्रमांक २२ एन दोन नुसार जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रधान असलेले अधिकाराचा वापर करून नांदेड जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जारी केले आहेत.येथील ठाण्यात सपोनि विश्वजीत कासले हे २८ सप्टेंबर २०२२ रोजी रूजू झाले होते.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या