सहशिक्षक एच.टी.राऊत सेवानिवृत्त !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे)
येथील सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मिलिंद विद्यालयाचे जेष्ठ तथा विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचे सहशिक्षक हरी तुकाराम राऊत हे जवळपास एकतीस वर्ष एक महिना या प्रदीर्घ सेवेनंतर आपल्या वयोमानानुसार आज दिनांक 31 जूलै 2022 रोजी आपल्या सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.
हरी तुकाराम राऊत हे येथील मिलिंद विद्यालयात 1 जुलै 1991 रोजी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचे सहशिक्षक म्हणून रुजू झाले. तेव्हापासून ते आजतागायत त्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचे धडे देऊन अनेक विद्यार्थ्यांना घडवले.ते एक विद्यार्थीप्रिय व शांतता प्रिय शिक्षक म्हणून कुंडलवाडी शहर व परिसरात ख्याती मिळवली.यांच्या या सेवानिवृत्ती निमित्य संस्थेचे अध्यक्ष कुणाल लोहगावकर,मुख्याध्यापिका एम एस खंदारे,डी एस पांचाळ,आदींसह शिक्षक,कर्मचारी,सर्व नातेमडळी यांनी शुभेच्छा देऊन पुढील आयुष्यासाठी मंगल कामना केल्या आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या