शालेय पोषण आहार योजनेचे सामाजिक अंकेक्षण व मुल्यांकनांची तपासणी !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
      येथून जवळच असलेल्या हुनगुंदा येथील सोन्याबाई ठक्करवाड माध्यमिक विद्यालयाचे दि 28 जानेवारी रोजी शालेय पोषण आहार योजनेचे सामाजिक अंकेक्षण व मुल्यांकन तपासणी झाली असून याबाबत तपासणी अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले आहे. 
महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई मार्फत कृषी वित्त महामंडळ इंडियाचे को-ऑर्डीनेटर सागर दत्तराम पतंगे यांनी शालेय पोषण आहार योजनेचे सामाजिक अंकेक्षण व मुल्यांकन तपासणी केले आहे.
याबाबत कृषी वित्त महामंडळ इंडियाचे को- सागर दत्तराम पतंगे यांनी तपासणी अंंती समाधान व्यक्त केले आहे. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी बी जिंकले, सहशिक्षक डी एस बोडके, बी एस गुरुडे, सौ एम डी सोमवंशी, सौ एस डी देगावे, यू व्ही भाले, एम एन आकुलवार, एन जी लोलापोड, एस एस म्याकलवार, आर एम म्याकलोड आदी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या