औराळा ग्रामपंचायत वर वंचित ची सत्ता ; सौ.वर्षा सतिश वाघमारे झाल्या सरपंच!

सरपंच सौ.वर्षा सतिश वाघमारे यांनी गावकऱ्यांना गावच्या विकासाच्या बाबतीत कमी पडणार नाही असा शब्द दिला.

ग्रामपंचायत औराळा सार्वत्रिक निवडणूक २०२१ दि.१०/०२/२०२१ रोजी सरपंच व उपसरपंच पदाची निवड झाली. या निवडणुकीत सरपंच पदी सौ.वर्षा सतिश वाघमारे तर उपसरपंच पदी सौ.रेखा साईनाथ पांढरे यांची निवड झाली. ग्रा.प.सदस्य संख्या एकूण ०७ पैकी ०५ सदस्य, सरपंच व उपसरपंच यांना मिळाले तर ०२ सदस्य विरोधात होते.

सरपंच व उपसरपंच निवडीनंतर सर्वच सदस्यांचे फटाक्याच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले.
● सत्ताधारी पॅनलचे सदस्य:

१) सौ.वर्षा सतिश वाघमारे.

२) सौ.रेखा साईनाथ पांढरे.

३) सौ.सविता गौतम वाघमारे.

४) भीमराव बाबजी वाघमारे.

५) जनार्धन विश्वनाथ ईबितदार.

● विरोधी पॅनलचे सदस्य:

६) साहेबराव गंगाराम गोपुलवाड.

७) शेख शहानुर महेबुब. 

अशा एकूण ०७ सदस्यांची संख्या आहे.

निवडणूक होऊ घातल्यापासून ते आज पर्यंत या निवडणुकीत परिश्रम घेणारे भगवान नागोराव वाघमारे, चंद्रकांत गणपती वाघमारे, संदेश गोविंदराव वाघमारे, बाळासाहेब आनंदा सोनकांबळे, प्रकाश बळीराम वाघमारे, रावसाहेब रुकमाजी वाघमारे, निवृत्ती शंकर सोनकांबळे, सुमेध वाघमारे, रमेश वाघमारे, बालाजी धुमाळ, साहेबराव ईबितवार, अरुण बालाजी धुमाळ, विश्वनाथ ईबितदार, प्रकाश सोनलकर, सुनिल वाघमारे, सदाशिव वाघमारे, एकनाथ वाघमारे, वसंत वाघमारे, भुजंग वाघमारे, किशन संभाजी, नागोराव संभाजी, सुधीर अंबर, शिलवंत वाघमारे, मिलिंद वाघमारे, रणजित वाघमारे, मारोती वाघमारे, खोब्राजी वाघमारे, प्रविण वाघमारे, हणमंत किशन, माधव सोनकांबळे,उत्तम सोनकांबळे, शंकर फुगले, गोविंद वाघमारे, प्रताप वाघमारे, विजय वाघमारे, राहुल वाघमारे, प्रसेनजीत वाघमारे, संजय वाघमारे आदिंची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या