नायगाव येथे तहसीलदार यांना निवेदन देत .उझबेगी परकीय आक्रमक बाबर याचा वंशज क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर महाराष्ट्रातून हद्दपार करण्याकरिता विहिंप बजरंग दल हिंदु संघटनांनी निवेदन सादर करुन प्रशासनाकडे मुख्यमंत्री फडणविस यांना नायगाव तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन सादर केले. छत्रपती संभाजी महाराज नगर या शहरात क्रूरकर्मा औरंग्या याची कबर आहे. वास्तविक, औरंगजेब अहिल्यादेवी नगर येथे मेला व नंतर त्याचे प्रेत काडून ते छत्रपती संभाजीनगर येथे पुरले व त्याठिकाणी त्याची कबर करण्यात आली.
याच औरंगजेबाने शिख गुरु तेगबहादूर यांची क्रूर हत्या केली. शिख गुरु गोविंदसिंह यांच्या दोन बाल साहेबजाद्यांना ते केवळ मुस्लिम होत नाहीत म्हणून त्यांना भितीत जिवंतपणे चिणून मारण्यात आले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रुर हत्तेचे वर्णन करता येणार नाही अशी भयंकर यातनामय हत्या याने केली. श्री काशी विश्वेश्वराचे मंदिर याने फोडले, मथुरा येथे असणाऱ्या सुंदर मंदिरांचा यानेच विध्वंस केला. सोरटी सोमनाथाचे मंदिर पुन्हा एकदा यानेच फोडले त्र्यंबकेश्वर मंदिर, जेजुरी गड यावर हल्ले केले हजारो हिंदूंच्या प्रेतांच्या राशी गावाबाहेर रचून हिंदूंची भयानक क्रूर कत्तल केली. छत्रपती शाहु महाराजांचे अनेक वेळा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. हिंदूचे मोठ्या प्रमाणावर धर्मातरण केले.असे निवेदनात नमुद केले असुन अश्या क्रूरकर्मा व आतातायी औरंग्याचे कुठलेही स्मारक अथवा कबर हि पूर्णपणे स्वतंत्र भारत देशात गुलामीचेच, अनत यातनांचे प्रतिक आहे.असे विहिंप बजरंग दल आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे विनंती करुन,प्रशासनाने हि कबर पुर्णपणे नष्ट करावी.
परकीयांचे कुठलेही नामोनिशाण हे नष्ट झाले पाहिजे. तरी प्रशासनाने योग्य पद्धतीने हि कबर पुर्णपणे काढून टाकावी. व हे न झाल्यास पूर्व सुचित करुन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल हिंदू समाजा बरोबर छ. संभाजीनगरकडे कार सेवेसाठी कूच करतील व औरंगजेबाची कबर ध्वस्त करतील.असे निवेदनाद्वारे सुचित करुन सादर केले असुन या निवेदनावर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल विहिंप बजरंग दल कार्यकर्त्ये कैलास माधवराव शिंदे, नेहा मंगेश कोटुरवार, नागेश मोरचोंडे, प्रवीण शिंदे, गणेश शिंदे, गणेश एक्कमवार, देवराव शिरपाळे, योगेश परमेश्वर कदम, गंगाधर चव्हाण, साई हुसे, वानखेडे, विशाल कागदेवाड, गजानन भालेराव यांच्या या निवेदनावर स्वाक्ष-या आहेत.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy