आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन ( महाराष्ट्र ) शाखा म्हसळा कार्यकारिणी निवड संपन्न !

[ म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे ]
आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर – महाराष्ट्र राज्य ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात पंधरा वर्षापासून कार्यरत आहे. ही संस्था सामाजिक शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुणवंत कर्मचारी पदाधिकारी यांचे गुणगौरव करते तसेच शाळा, गोरगरीब जनता यांना वस्तू रूपाने मदत करत असते कोल्हापूर पासून सुरु झालेले हे छोटसं रोपटे आज भारतभर पसरलेला आहे.
“जिल्हा कार्याध्यक्ष – श्री.किशोर मोहिते, तालुका अध्यक्ष – प्रा.महंमद शेख, तालुका सरचिटणीस- श्री.रमेश जाधव, महिला आघाडी प्रमुख – सौ. संगिता बा.आंबेडकर यांची निवड झालेली आहे”.
या नावाजलेल्या संस्थेमध्ये तालुका कार्यकारिणीची आविष्कार ग्रुप म्हसळा या नावाने सुरुवात करून आविष्कार ग्रूप म्हसळा कार्यरत झाला आहे.त्यामध्ये जिल्हा कार्याध्यक्ष श्री.किशोर मोहिते तसेच अध्यक्ष म्हणून प्राध्यापक श्री.महंमद शेख सेक्रेटरी म्हणून सरचिटणीस म्हणून श्री रमेश गोविंदराव जाधव तर महिला आघाडी प्रमुख म्हणून संगीता आंबेडकर यांची निवड झाली आहे त्याबद्दल सर्व क्षेत्रातून निवडलेल्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या