कंधार पंचायत समितीकडून घरकुलांचे बांधकाम 3 महिन्यात पूर्ण करणा-यांना सन्मानित करून सन्मान पत्र !

[ कंधार प्रतिनिधी – पंढरी तेलुरकर ]
दिनांक 27/09/2022 रोजी कंधार पंचायत समितीचे बी.डी ओ.मांजरमकर, विस्तार अधिकारी व सरपंच संघटनेचे तालुका अध्य़क्ष पंढरे सर यांच्या हस्ते राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा पुरस्काराने पत्रकार पंढरी व्यंकटी वाघमारे यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

तालुक्यांमध्ये बऱ्याचशा लोकांना सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याठिकाणी तालुक्यातील सरपंच, इंजिनियर व पंचायत समितीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. रोजगार सेवक गणपत वाघमारे व तालुक्यातील सर्व रोजगार सेवक उपस्थित होते.

या वर्षी 1988 घरकुल कंधार तालुक्याला आले आहेत. तालुक्यातील सर्व घरकुल धारकांनी आपले आलेले घरकुल किमान 3 महिन्यात पूर्ण करावेत असे मांजरमकर यांनी सागितले.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या