पुरस्कार हा सहजासहजी कोणालाही मिळत नसतो – प्राचार्य श्री संदीप कांबळे

[ रायगड /म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे ]
श्री समर्थ शिक्षण संस्था संचालित कला व वाणिज्य उच्च माध्यमिक विदयालय मेंदडी येथे रायगड जिल्हा परिषदेने म्हसळा तालुक्यातील श्री किशोर मोहिते यांना शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला.
या निमीत्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला या वेळी कला व वाणिज्य उच्च माध्यमिक विदयालय चे प्राचार्य यांनी असे वक्तव्य केले कि पुरस्कार हा सहजासहजी कोणालाही मिळत नसतोय त्या साठी आपल्या कार्याची पावती द्यावी लागते आपली निस्वार्थ सेवा व आपल्या कामा प्रती असलेली तळमळ, समर्पणाची भावना हे पुरस्काराचे गमक होय हे तुमच्या मध्ये पाहिलं जातय हे सन्माननीय श्री किशोर मोहिते सर यांच्या कामातून दिसून येतंय.

 

हे या वेळी रा.जि. प शाळा मुख्याध्यापक श्री दिनेश पाटील सर मेंदडी हायस्कुल चे मुख्याध्यापक श्री चाळके सर, सह्य. शिक्षक श्री रुपेश कांबळे या कार्यक्रमाला उपस्थित होते.श्री दिनेश पाटील सर यांनी सत्कार मूर्ती विषयी बोलत असताना त्यांच्या कामाविषयी प्रकाश टाकला.
श्री किशोर मोहिते सर हे रा. जि. प. शाळा मेंदडी मराठी येथे पदवीधर शिक्षक या पदावर कार्यरत असून त्यांनी 15 जून 1995 रोजी सेवेची सुरुवात कांदळवाडा येथून केली.यानंतर ढोरजे , गटसाधन केंद्र , येथे काम केले.सध्या पदवीधर शिक्षकाबरोबरच प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
सेवेच्या सव्वीस वर्षाचे कालावधीत शिक्षकांच्या सहकार्याने वेगवेगळे शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविले.शाळाबाह्य व दिव्यांग मुलांचा शोध घेवून त्यांना शाळेत आणून टिकवून ठेवणे, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
कोवीड, निसर्ग चक्रीवादळ या काळात मा गटविकास अधिकारी,मा गटशिक्षणाधिकारी यांचे आदेशानुसार गावागावांत ग्रामस्थांच्या भेटी,मिटींग घेवून उद्बोधन केले.शिक्षक, विविध संस्थांचे वतीने जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप, रक्तदान शिबिर आयोजन केले . अमृत महोत्सव निमित्त शाळा व केंद्रात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले ग्रामस्थांचे सहकार्याने विविध भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. त्यांना विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.
या सर्व बाबींचा विचार करून 2022 चा रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला याबद्दल शिक्षक संघटना पदाधिकारी, तालुक्यातील शिक्षक, मित्र परिवार यांनी शुभेच्छा दिल्या.श्री प्रमोद चाळके सर यांनी हि आपले मनोगत मांडले, प्रा अंगद कांबळे यांनी हि श्री मोहिते यांच्या कार्याविषयी मतव्यक्त केले.
कार्यक्रमास प्रा. आकाश साळवी विध्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव नाकती यांनी केले इ. मान्यवरांच्या उपस्थितीत मा. श्री किशोर मोहिते सर यांचा सत्कार पुष्पगुछ देऊन सन्मानित करण्यात आले या वेळी मान्यवरांनी सत्कारमूर्तीच्या कार्याबद्दल भरभरून कौतूक केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या