गणेश उत्सवानिमित्त समाज प्रबोधन कार्यक्रम घेणे गरजेचे – अ.पो.अधीक्षक निलेश मोरे !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]

गणेश उत्सवानिमित्त समाजात वेगवेगळ्या स्वरूपाचा संदेश पोहोचविण्यासाठी काळानुसार समाज उपयोगी असणारे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी शांतता समिती बैठकीत व्यक्त केले.

नायगाव पोलीस ठाणे येथे आगामी गणेश उत्सव व शेतकऱ्यांचा पोळा हा धार्मिक सण एकोप्याने साजरा करावा यातून समाजाला अभिप्रेत असलेले प्रबोधनाचे कार्यक्रम घेत असताना यातून शांततेचा संदेश जावा यासाठी शांतता समिती बैठक आयोजित केलेल्या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, तहसीलदार प्रतिनिधी देवराय, गटविकास अधिकारी फांजेवाड, नगराध्यक्ष प्रतिनिधी नारायण जाधव, नायगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनी महादेव पुरी, रामतीर्थ पोलीस ठाण्याचे संकेत दिघे, महावितरणचे कार्यकारी अभियंता गणेश दांडगवाल, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पोहरे, नगरसेवक शरद भालेराव, संजय भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या सूचना मांडल्या नंतर निलेश मोरे बोलताना पुढे म्हणाले की, नायगाव शहर व परिसर हे पूर्वीपासूनच शांतता प्रिय आहे, गणेश उत्सवानिमित्त रक्तदान शिबीर, वृक्ष लागवड, नाटके असे विविध समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेऊन समाजात एक चांगला संदेश पोहोचविणे यासाठी स्पर्धा घेऊन भविष्यात त्यांचा योग्य ते सन्मान नायगाव कुंटूर रामतीर्थ या तीनही पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येईल असेही ते म्हणाले. यावेळी सहाय्यक पो.नि.शिवकुमार बाचावार, महावितरणचे सहाय्यक अभियंता सुरेंद्र दुधमल, प्रथम नगराध्यक्षा प्रतिनिधी पंढरी भालेराव, नगरसेवक प्रतिनिधी रवींद्र भालेराव, पिंपळगाव सरपंच किरण कदम, लालवंडी सरपंच युवराज वरवटे, होटाळा सरपंच गणेश पवार, शेळगाव छत्री सरपंच जळबा वाघमारे, माणिक पाटील चव्हाण, जनमित्र विक्रम भालेराव, प्रकाश कामळजकर यासह विविध गावातील पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे संचालन व आभार वसंत माने यांनी मांनले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या