विध्द व अग्निकर्म प्रभावी शास्त्रोक्त आयुर्वेदिक शूलहर चिकित्सा !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
        आयुर्वेदिय चिकित्सा करत असताना वेदना व शूल त्वरीत नाहीसा कसा करता येईल असा विचार माझ्या मनात सतत असे. व्यवहारामध्ये शूल असणारा माणूस अस्वस्थ असतो. कारण त्याला प्रत्येक क्रिया करताना त्रास जाणवत असतो. मला इन्जेक्शन द्या, गोळी द्या आणि शूल थांबवा असेच त्याचे मागणे असते. काही रुग्ण तर स्नेहन स्वेदनांदी उपचार घेउन आलेले असतात. सध्या शूल नाहीशी करणारी अनेक औषधे बाजारांत उपलब्ध आहेत. सामान्यतः ती Pain killers (NSAIDS) मध्ये वर्गीकृत होतात.या सर्व औषधांचा रक्तवह व मूत्रवह स्रोतसावर – संस्थेवर विपरीत परिणाम होतो. अतिशय पित्त करण्याची त्यांची प्रवृत्ती असते.आणि अशा तर्हेचे होणारे परिणाम बरे करणे त्रासदायक ठरते.

 

        आयुर्वेदांतील शूलहर द्रव्ये Pain killers (NSAIDS) इतकी प्रभावानी काम करणारी शूलहर नाहीत. स्नेहन-स्वेदन मर्यादित स्वरुपात उपशम देते. एवढ्या मोठ्या वैद्यकशास्त्राला “ त्वरीत आराम देणारी” “शूलहर” चिकित्सा ठाऊक नाही हे मनाला पटत नव्हते. शिकत असताना आणि नंतरही आयुर्वेदांत शूलासाठी म्हणून सांगितलेली दोन कर्मे – अग्नीकर्म- व रक्तमोक्ष-विध्द चिकित्सेचा उपयोग केल्यास तत्काळ वेदना शमन होताना प्रत्ययास आले. 
विद्ध आणि अग्निकर्म चिकित्सा या विषयी थोडी माहिती;
प्रश्न: विद्ध कर्म कसं करतात?
उत्तर: व्याधिनुसर वेगवेगळ्या स्थानावर एक पोकळ सुई( २६ नंबर ची इन्सुलिन नीडल) टोचून काढून घेतात.
प्रश्न: सुई टोचतांना वेदना होतात का?
उत्तर: सुई टोचली/ मुंगी चावली की आपल्याला जाणवत तेवढंच जाणवतं, जास्त वेदना होत नाहीत कारण आपण त्यात कुठलं औषध सोडत नाही.
प्रश्न: अग्नि कर्म कसं करतात?
उत्तर: सोन्याच्या काडीने विशिष्ट स्थानावर अप्रत्यक्षरित्या डाग देणे म्हणजे अग्नि कर्म. रुग्णाला सहन होईल एवढाच वेळ आपण त्या स्थानावर अग्नि कर्म करत असतो.
प्रश्न: अग्नि कर्म केल्यावर त्या ठिकाणी डाग राहतो का?
उत्तर: सोन्याची काडी प्रत्यक्ष गरम न करता, त्या सोन्याच्या काडीचा एक टोक त्वचेवर ठेवून दुसरा टोक मेणबत्ती च्यासहाय्याने गरम केला जातो. त्यामुळे कुठलाही डाग त्वचेवर पडत नाही.
अग्नि कर्मा साठी वापरली जाणारी इतर द्रव्ये: हळकुंड, मातीची शलाका, गुळ, लोह शलाका.
प्रश्न : विद्ध आणि अग्नीकर्म चिकित्सा किती दिवस करावी लागते?
उत्तर : व्याधी किती दिवसाचा आहे यावर चिकित्सा किती दिवस द्यावी लागेल हे ठरते, उदाहरणार्थ टाचेच्या दुखण्यासाठी एकदा अग्निकर्म सुद्धा पुरेसे असते तर मणक्याच्या काही आजारांमध्ये जास्त दिवस लागू शकतात. आजार जुनाट असेल तर चिकित्सेसाठी लागणारा वेळ हा जास्त असू शकतो आणि आजार नवीनच असेल तर आजार तात्काळ बरा होऊ शकतो.
प्रश्न : दवाखान्यात राहण्याची गरज आहे का ?
उत्तर : अग्निकर्म आणि विद्ध कर्म या चिकित्सा ओपीडी बेसिस वर म्हणजेच ॲडमिट न होता करता येणे सहज शक्य आहे.
पेशंट दिवसातून एक किंवा दोन वेळेस दवाखान्यात येऊन पूर्ण चिकित्सा घेऊ शकतो.
प्रश्न : विद्ध आणि अग्नी कर्मासाठी काही पूर्व तपासण्या जसं रक्त लघवी तपासणी आवश्यक आहे का?
उत्तर : विद्ध आणि अग्निकर्मा साठी विशिष्ट तपासण्यांची गरज नसते परंतु व्याधींच्या निदानासाठी मात्र व्याधीनुसार रक्त लघवी व इतर तपासण्या करणे आवश्यक आहे.
प्रश्न : विद्ध आणि अग्निकर्म साठी काही वयोमर्यादा आहे का?
उत्तर : ग्रंथानुसार दहा वर्षाखालील रुग्णांना विद्ध आणि अग्निकर्म करू नये असे सांगितले आहे, परंतु पाच वर्षाच्या रुग्णाला आम्ही विद्ध कर्म केले आहे, व त्याला व्याधी उपशम पण मिळाला आहे जर रुग्ण सहकार्य करत असेल तर वयाची अडचण येत नाही.
प्रश्न : गर्भिणी मध्ये अग्निकर्म किंवा विद्ध कर्म करता येते का?
उत्तर : गर्भिणी मध्ये कटी प्रदेश सोडून इतर ठिकाणी विद्ध आणि अग्नि कर्म केल्यास अडचणी येत नाहीत हा आमचा अनुभव आहे
प्रश्न : विद्ध आणि अग्निकर्म कोणत्या रुग्णांमध्ये करू नये?
उत्तर : विद्ध आणि अग्निकर्म करण्याच्या ठिकाणी म्हणजे त्वचेवर कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल तर तिथे हे अग्निकर्म किंवा विद्ध कर्म टाळावे.
जे रुग्ण मानसिक दृष्ट्या दुर्बल असतील ज्यांना रक्त पाहून भोवळ येत असेल अशा रुग्णांना अग्निकर्म किंवा विद्ध कर्म करू नये.
प्रश्न : विद्ध आणि अग्निकर्म चिकित्सा घेत असताना दैनंदिन कामे करता येतात का?
उत्तर : हो तुम्ही तुमची दैनंदिन सर्व कामे करू शकता.
प्रश्न : मधुमेहाच्या रुग्णांमध्ये अग्निकर्म व विद्ध कर्म करता येते का?
उत्तर : मधुमेहाच्या रुग्णांमध्ये सुद्धा विद्ध आणि अग्निकर्म चिकित्सा करता येते पण विशेष काळजी घ्यावी लागते.
विद्ध आणि अग्नि कर्माने बरे होणारे व्याधी( सोबत गरजेनुसार औषधोपचार आणि पंचकर्म सुद्धा करावे लागते):
१) मन्याशुल- मान दुखणे( cervical spondylosis)
२) कटिशुल – कंबर दुखणे ( lumbar spondylosis, slip disc, disc bulge etc.)
३) जानु संधिशुल- गुडघे दुःखी ( knee joint pain due to arthritis, etc)
४) गृध्रसी – कमरेपासून खाली पाय दुखणे ( sciatica)
५) पार्श्नि शुल – टाच दुखी ( calcaneal spur)
६) पृष्ठ शुल – पाठ दुखी ( back ache)
७) अंस संधिशुल – खांदे दुखी ( frozen shoulder)
८) कुर्पर संधिशुल – tennis elbow
९) पाद शुल – पाय दुखी
१०) कदर – कुरूप (corn)
११) पाद दाह – तळपायाची आग होणे (burning sensation of foot)
१२) वातरक्त – gout
१३) प्रवाहिका – वारंवार चिकट परसाकडे होणे ( IBS)
१४) मुत्राश्मारी – मुतखडा ( kidney calculus, ureteric calculus, bladder calculus)
१५) उन्माद – मानस विकार ( mental disorders, anxiety, depression, etc)
१६) अपस्मार – फिट येणे ( epilepsy)
१७) दंत रोग – दात दुखी ( dental pain)
१८) नासा रोग – वास न येणे( गंध ज्ञान न होणे), नकाच हाड वाढणे ( DNS, nasal polyps, etc) 
१९) शिरोरोग – डोके दुखी (headache, migraine)
२०) नेत्ररोग – डोळे नेहमी दुखणे ( subconjunctival haemorrhage, pterygium)
२१) कर्ण रोग – कान दुखणे, कमी ऐकू येणे( ear ache, hearing loss)
२२) hepatomegaly
२३) Splenomegaly
२४) Bronchitis
२५) तमकश्वास – दमा ( Bronchial asthma)
२६) Allergic rhinitis
२७) Stomatitis – तोंड येणे
२८) burning sensation of any part of body.
२९) पक्षाघात – वारा निघणे ( paralysis)
३०) अर्दित – चेहरा वाकडा होणे/ चेहऱ्याचा वारा निघणे ( Bell’s palsy) 
इत्यादी
अग्निकर्माचे लाभ
 • विविध रोगांवर वापरले जाऊ शकते.
 • त्वरित वेदना आराम देते.
 • विविध प्रकारच्या प्रोबचा वापर करून करता येते.
 • अग्निकर्माने एकदा उपचार केलेले रोग पुन्हा होत नाहीत.
 • ज्या रोगांवर औषधे, क्षार आणि अगदी शास्त्रकर्म वापरूनही उपचार करता येत नाहीत अशा रोगांमध्येही याचा यशस्वीपणे उपयोग केला जाऊ शकतो.

● ● अधिक माहिती साठी संपर्क- वैद्य मंचे योगेश रमेश ●●
[ MD Phd ( scholar ) Ayurved ]
श्री विश्वलक्ष्मी आयुर्वेद चिकित्सालय,अग्निकर्म विद्धकर्म केंद्र, अहमदनगर 
( 7972116697, 7218008880 )

ताज्या बातम्या