देश आजादी अमृत महोत्सवानिमित्त वीर जवान व तृतीयपंथीयांचा नायगावात सन्मान !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नायगावात शहरातील छ. शिवाजी महाराज चौक येथे ज्येष्ठ नागरिक भाऊराव पाटील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तर गजानन पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व माजी शिक्षण सभापती शिवराज पा. होटाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वीर जवान सैनिकांचा व उपेक्षित घटकातील ज्यांना समाज नाकारतो अशा तृतीयपंथी यांचा सन्मान करण्यात आला.
  भारत देश हा इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होऊन 75 वर्षे पूर्ण झाल्याने देश आजादी अमृत महोत्सव अभियान देशाचे लाडके पंतप्रधान मा नरेंद्र भाई मोदी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम केंद्र शासनाने राबविण्याचे निर्देश दिले असल्याने सर्वत्र तिरंगा हा राष्ट्रीय ध्वज फडकल्या गेला असून या निमित्ताने नायगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सामाजिक तथा राजकीय कार्यकर्ते गजानन पाटील चव्हाण यांच्या पुढाकारातून ऊन वारा पाऊस थंडी व शत्रूशी सामना करून आपले खडतड देशसेवा पूर्ण करून कार्यरत असलेले सैनिकांचा आणि या सोबत आपले कोणीही नसते असे म्हणून आयुष्याचे दिवस काढणाऱ्या उपेक्षित समाजातील तृतीयपंथी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी सत्कारमूर्ती वीर जवान नायक महंमद शादुलसाहब पिंजारी पळसगावकर, महाराष्ट्र हिजडा क्रांती संघटनेचे अध्यक्ष रेखाताई देवकर बनसोडे, शितल देवकर, शिल्पा देवकर, पायल देवकर, अबोली देवकर, सोनु देवकर, कोयल, संध्या, चुटकुली देवकर, राजेंद्र सोनकांबळे, विनायक पाटील चव्हाण , राजूभाऊ सोनकांबळे, चंद्रकांत तंमलुरे, राजेंद्र सोनकांबळे , प्रदीप भाऊ देमेवार, अशोक पवार ,प्रवीण बिरेवार ,गणेश पाटील देगावे, शिवराज पाटील शिंदे, प्रमोद बिरेवार संजय गुजरवाड, किरण पाटील मोरे ,सह नायगाव तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक शेतकरी बांधव व्यापारी बांधव सह मोठ्या संख्येने आदिजनाची उपस्थित होते. 
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या