बिलोली येथे आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने वाहतुक नियमांची जनजागृती अभियान संपन्न !

(बिलोली ता.प्र.सुनिल जेठे)
तालुका विधी सेवा समिती बिलोली व तालुका अभियोक्ता संघ बिलोली यांच्या संयुक्त विद्दमाने आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने वाहतुक नियमांची जनजागृती अभियान  दि.१३ जानेवारी रोजी नगर परिषद येथुन सुरुवात केलेल्या कार्यक्रमात जिल्हा न्यायाधीश -१ बिलोली चे मा.श्री.दिनेश ए.कोठलीकर व मा.श्री.एस, बी.डिगे यांच्या अध्यक्षतेखाली रास्ता सुरक्षा हेल्मेट रॕली काढण्यात आली.

सदरिल बिलोली शहरात मोठ्या संख्येने आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने वाहतुक नियमांची जनजागृती केलेल्या कार्यक्रमात रास्ता सुरक्षा हेल्मेट रॕली व पायी चालतांना रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड च्या वतीने नागरिकांना जनजागृती अभियानाच्या माध्यमातून संदेश दिला.

 

यावेळी  न्यायाधीश  मा.श्री.दिनेश ए,कोठलीकर, मा.श्री.एस, बी.डिगे सह प्रा.प.अ. नांदेड चे मा.श्री,संदिप निमसे,उपविभागीय अधिकारी बिलोली मा.श्री.सचिन गिरी, तहसिलदार मा.श्रीकांत निळे, पोलिस निरीक्षक मा.श्री.अनंत नरुटे, न.प,मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, मोटार वाहन निरीक्षक मा.आर.एस,ढोबळे, मोटार वाहन निरीक्षक मा.अनंत गायकवाड यांच्यासह बिलोली शहरातील भाजपा युवा मोर्चा चे तालुका अध्यक्ष  इंद्रजित तुडमे, माजी नगरसेवक जावेद कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते मुकिंद कुडके,संदिप कटारे, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे प्रतिनिधी धम्मदिप गवांडे, अशोक वाघमारे, शेख नवाब ह्यांची सुरक्षा जवान देखील अमृत महोत्सव निमित्ताने वाहतुक नियमांची जनजागृती अभियानात सहभागी झाले होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या