130 व्या जयंती निमित्त महामानवास म्हसळा शहरातील संस्था आणि शाळेनी दिली मानवंदना !

(रायगड/म्हसळा ता.प्रतिनिधी-प्रा.अंगद.प्र.कांबळे)
 म्हसळा शहरातील सर्व सरकारी, निम सरकारी संस्था, शाळा महाविद्यलयात भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वविभुषित, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची  130 वी जयंती साजरी करण्यात आली.

न्यू इंग्लिश स्कुल व जुनियर कॉलेज म्हसळा येथे या कार्यक्रमास. प्राचार्य श्री.प्रभाकर मोरे सर यांच्या हस्ते महामानवास पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमास शिक्षक श्री.अत्तार सर, श्री.कामडी सर, श्री.खोकले सर, श्री.भायदे सर, श्री जंगम, श्री. आम्ले सर, सूर्यवंशी सर हे उपस्थित होते.

कालसूरी येथील प्रभाकर ना.पाटील माध्यमिक शाळा  काळसूरी या शाळेत महामान वास पुष्पअर्पण करण्यात आले. या कार्यक्रमास श्री.चवरे सर, श्री.अनिकेत दर्गे, श्री.पाडवी सर, श्री कामडी, श्री.डावखर, श्री.चाळके हे उपस्थित होते.
तोंडसुरे येथील जिल्हा परिषद शाळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक श्री.महात्रे सर, श्री.दिपक सोनुले सर,श्री. राजेश खटके हे उपस्थित होते.

जिजामाता मराठी माध्य.शाळा वरवठणे आगारवाडा शाळेत महामानवास पुष्पहार अर्पण करण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापक श्री.संदीप सुतार, श्री कांबळे अ.प्र, श्री.गाणेकर च. ह, श्री.गाणेकर ल.ह, हे उपस्थित होते.
कला व वाणिज्य उच्चमाध्यमिक विद्यालय मेंदडी कोंड या विद्यालयात प्राचार्य श्री.संदीप कांबळे, श्री.नाकती, श्रीमती नीलम कांबळे, श्री गणेश नाकती, श्री.कुडेकर यांच्या उपस्थित महामानवास अभिवादन करण्यात आले.

ताज्या बातम्या