तालुक्यातील दरेगाव येथे जनसेवक स्व. बबन खंडू दरेगावकर यांच्या पुण्यस्मरणार्थ १९ फेब्रुवार रोजी युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांच्या पुढाकाराने माजी सरपंच स्व. बबन खंडू दरेगावकर यांचे पुण्यस्मरण दरवर्षी गावांतील जेष्ठ नागरिक, महिलांच्या उन्नतीसाठी व विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात भरारी घेण्यासाठी गावात सामाजिक उपक्रम राबवून आगळा-वेगळा उपक्रम आयोजित केला जातो. यावर्षी सुद्धा “गावचा भूमिपुत्र घरा-घरात बालमित्र” हा नाविन्यपूर्ण विद्यार्थ्यांना उपयुक्त असणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या उपकरमाअंतर्गत गावातील लहान मुलांसाठी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून सोनू दरेगावकरांनी मोफत बालमित्र पुस्तक वाटप करून स्व. बबन खंडू दरेगावकर यांना खरी आदरांजली अर्पण केली. यावेळी श्रीराम शिंदे, मारोती चिंतेवाड, सुभाष चिंचाळे, दशरथ बैलके, तुकाराम घोणशेटवाड, महाजन बैलके, प्रविण सूर्यवंशी, राजू शिंदे, जळबा शिंदे, दत्ता बैलके, उत्तम बैलके, माधव आमनवाड, दीपक गवाले, साईनाथ बैलके, विठ्ठल बैलके, गोविंद बैलके, मारोती बैलके, शुभम बैलके, किशन बैलके, श्याम बैलके, नागेश दरेगावकर यांच्यासह गावातील जेष्ठ नागरिक व महिला उपस्थित होत्या.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy