म्हैसा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे थाटात अनावरण !

[ भोकर – एल.ए.हिरे ]
भोकर पासून जवळच असलेल्या तेलंगाना म्हैसा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे दि. 4 मार्च रोजी सकाळी बारा वाजता माजी खासदार तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले आहे.
यावेळी उद्घाटनपर भाषणात अँड.प्रकाश आंबेडकर म्हणाले बाबासाहेबांनी चळवळीच्या माध्यमातून वेगळ अस्तित्व निर्माण केलं देशातील अर्थव्यवस्था तळागाळापर्यंत गेली नाही तर पुन्हा गुलामी येईल सरकार खाजगीकरण करून जुन्या पद्धती जुनी व्यवस्था लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला अर्थव्यवस्था गरिबांपर्यंत गेली पाहिजे ती जर नाही गेली तर माणूस गुलाम बनतो बाबासाहेबांचा लढा सर्वांच्या हक्कासाठी होता बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यासाठी  म्हैसा येथील मुस्लिम बांधवांनी सहकार्य केल सर्वच पक्षाच्या लोकांनी मदत केली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.

 

यावेळी आपल्या तडाखेबाज भाषणात तेलंगणा प्रदेश अनु.जातीचे प्रदेशाध्क्ष दयाकर आंदकी यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी येथील वर्णव्यवस्था जातीयवादा विरुद्ध जीवनभर संघर्ष करीत तमाम अस्पृश्य समाजासाच्या उध्दारासाठी जीवन खर्च घातले डॉ.आंबेडकर हेच दलित बहुजनांचे खरे उध्दारक असल्याचे सांगितले.आमदार विठ्ठल रेड्डी म्हणाले बाबासाहेबांच्या विचारांची देशाला गरज आहे.प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी देशातील सर्व गोरगरिबांना संविधानातून समानतेचे हक्क दिले आहेत.

यावेळी माजी.आमदार नारायण पाटील, रामराव पाटील, भाजपच्या डॉ.रमादेवी, चित्रपट यांची भाषणे झाली व्यासपीठावर महाराष्ट्र वंचित ब.आघाडीच्या रेखा ठाकूर, फारूख अहैमद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष अँड.प्रसेनजीत आग्रे, सायलूदादा म्हैसेकर, शंकर चंद्रे, नगरसेवक गौतम पिंगळे, डॉ. दगडे, देविदास हासडे, गिरीधर जंगमे, एल.ए.हिरे, भारत वाघमारे, अँड.शंकर गडपाळे, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
तळपत्या उन्हात हजारो महिला पुरुष उपस्थित होते. रात्रीला प्रसिद्ध शाहीर राहुल अन्विकर यांचा बुद्ध भीम गीताचा बहारदार कार्यक्रम झाला. 
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या