बाळापूर येथे डॉ. आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न ; सामाजिक उपक्रम राबवून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

[ धर्माबाद प्रतिनिधी – चंद्रभीम हौजेकर ]
विश्वरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात जल्लोषात धर्माबाद शहरातील सिद्धार्थ नगर बाळापूर या ठिकाणी आणि फुलेनगर रामनगर, सरस्वती नगर, इंदिरानगर, डॉ.आंबेडकर नगर, हर्ष नगर, रसिक नगर, शिवाजीनगर, रेल्वे कॉलनी आदी ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून निळे ध्वज रॅली काढून, जल्लोषात शहरातून विविध नगरातून मिरवणूक काढून साजरी करण्यात आली.

 

सिद्धार्थ नगर बाळापूर येथील विश्वशांती बुद्ध विहाराच्या प्रांगणात मात्र सामाजिक उपक्रम राबवून विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, गायन स्पर्धा , यातून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.
बुगी बुगी हा संस्कृतीक कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये राजेश हैदराबाद प्रथम, मनीषा जाधव नितीन जाधव द्वितीय, तृप्ती घाटे तृतीय, श्रुती माकणे श्री कोठारे समीक्षा कोठारे ग्रुप यांना प्रोत्साहन पर बक्षीस देऊन जयंती मंडळाच्या वतीने सन्मानपत्र, मोमेंटो, पंचरंगी शाल, पुष्पहाराणे त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी निरीक्षक म्हणून मारुती छपरे, चिलकेवार सर, सौ मंगला वास्टर मॅडम, यांची विशेष उपस्थिती होती.
14 एप्रिल रोजी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली होती. वक्तृत्व स्पर्धेची सुद्धा आयोजन करण्यात आले होते. यावेळी भीम जयंती मंडळाच्या वतीने अध्यक्ष कीर्तीराज गायकवाड यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेची पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पत्रकार चंद्रभीम हौजेकर यांनी सामुदायिक त्रिशरण, पंचशील, बुद्ध पूजा, भीमस्मरण, भीमस्तुती आदी गाथा पठण करून पूजा पाठ करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीमराव खंडेलोटे यांनी केले.
यावेळी विविध उपक्रम राबवून जे स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या सर्व विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
एम.बी.बी.एस. यामध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले डॉ. प्रणव श्रावण जाधव यांचा जयंती मंडळाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी यशवंत सूर्यवंशी, विजय सूर्यवंशी यांनी सुद्धा डॉ. प्रणव जाधव, सैनिक सयद उसुफ, यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नामदेव सूर्यवंशी, गंगाधर कोठारे,प्रेम घाटे, गंगाधर जाधव, दिलीप झुंजारे, साहेबराव सोनकांबळे, देविदास पैलवान, रमेश कोठारे, चंद्रमुनी गायकवाड, यशवंत सूर्यवंशी, लक्ष्मीकांत सोनकांबळे, यांची यावेळी उपस्थिती होती. बुगी- बुगी मधील विजयी स्पर्धकांना सौ. वंदना संजय जाधव, बलवान सोनकांबळे, अविनाश गायकवाड, पत्रकार चंद्रभीम हौजेकर, आकाश झुंजारे, साईनाथ जाधव यांच्यातर्फे रोख रक्कम, सन्मानपत्र, देऊन विजयी स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मेहता जाधव, एस टी जाधव, तृप्ती घाटे, ऋतुजा रत्नपाल सूर्यवंशी, डॉ. प्रणव श्रावण कुमार जाधव, ऋषिकेश यशवंत सूर्यवंशी ,सुधाकर जाधव, शुभांगी निलेश वाघमारे आदींनी आपले विचार मांडले. यावेळी विश्वशांती महिला मंडळ ,प्रज्ञा संघातील नवतरुण, बांधव भीम जयंती मंडळाचे पदाधिकारी यांनी संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
यामध्ये बाल बालिका, लेझीम पथक, डीजेच्या तालावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गीते, जयघोषाने, नारे देऊन धर्माबाद शहर दुमदुमले या रॅलीमध्ये तरुण-तरुणी व समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दिवसभर चाललेले विविध उपक्रम व सामाजिक प्रबोधन आणि विविध स्पर्धेचे आयोजनात पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवून मिरवणूक शांततेमध्ये पार पडली.
यामध्ये अनेक मान्यवर, पत्रकार बांधव, विविध जाती धर्माची व विविध पक्ष संघटनेची पदाधिकारी या रॅली व मिरवणुकीमध्ये सामील होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती शांततेमध्ये पार पाडण्यासाठी धर्माबादचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर कत्ते , वाडेकर, मसलेकर, यांनी बंदोबस्त ठेवून अगदी शांततेमध्ये मिरवणूक विविध कार्यक्रम संपन्न झाले.
नटराज चौक, नरेंद्र चौक, नेहरू चौक, पोलीस ठाणे मार्गे, नगरपालिका चौक, पानसरे चौक, नरेंद्र चौक ते बाळापूरच्या मुख्य रस्त्याने येऊन विश्वशांती बुद्ध विहार या ठिकाणी येऊन मिरवणूक सरनेतेय गाथा घेऊन विसर्जन करण्यात आले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या