पंचवटी हायस्कूल राहेर येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
आज दि 14 एप्रिल 2023 रोजी पंचवटी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राहेर येथे महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
बाबासाहेबांना अभिवादन करून विद्यार्थ्यांचे वाचन घेण्यात आले. शिक्षक आमदार मा. विक्रम काळे साहेब यांनी नुकतेच शाळेला महत्वपूर्ण पुस्तके भेट दिलेली आहेत.
आजच्या वाचनात विद्यार्थ्यांनी त्या पुस्तकांच्या वाचनाला पसंती दर्शविली. या प्रसंगी शाळेचे विद्यमान प्राचार्य आदरणीय श्री एम आर मोरे सर, पर्यवेक्षक शिवानंद लाटकर सर, प्रेरणा खाजगी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था मर्यादित कुंडलवाडी चे चेअरमन मा एल जी पाटील, ज्येष्ठ पत्रकार संजय ठिकाणे पाटील यांच्यासह शाळेतील समस्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होतें.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या