बाभळी बंधारा दशकपूर्ती निमित्त धर्माबाद करांचा विकासासाठी लढा उभारण्याचा निर्धार ; कृती समिती दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याची भेट घेणार

सरकार गतिमान असून संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही म्हणून 2050 पर्यंत धर्माबाद व मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील विकासाचा आराखडा तयार केला असून कृती गतिमान केली पाहिजे.

डॉ. बालाजी कोम्पलवार (बाभळी बंधारा कृती समिती सचिव)

धर्माबाद कराना संघर्षाशिवाय काही मिळाले नाही म्हणून धर्माबाद करानो आता पुन्हा एकदा संघर्षासाठी तयार व्हा असे आव्हान केले.

नागोराव पा.रोशनगावकर (बाभळी बंधारा कृती समिती अध्यक्ष)
[ धर्माबाद – चंद्रभीम हौजेकर ]
तालुक्यातील गोदावरी नदी काठावर बांधलेल्या बाभळी बंधाऱ्याच्या संदर्भात दि. 19 जुलै रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष तथा मार्केट कमिटीचे माजी सभापती गणेशराव पाटील करखेलीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. बाभळी बंधारा कृती समितीचे अध्यक्ष नागोराव पाटील रोशनगावकर व सचिव तथा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. बालाजी कोम्पलवार यांनी मार्गदर्शन केले.
बाभळी बंधाऱ्याचे बांधकाम होऊन दि. 29 ऑक्टोबर2023 रोजी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या दहा वर्षाच्या काळात बाबळी बंधाऱ्यात पाणी जमा करणे व सोडणे हे होत असल्याने जमलेल्या पाणीसाठ्याचा त्याने कोणताही विनियोग केला जात नाही. बांधकामाच्या दशकपूर्ती निमित्ताने धर्माबाद विकास दशक पूर्ती विशेषांक काढण्याचा, बंधाऱ्याच्या विकासासाठी, तालुक्यातील विकास कामाचे प्रश्न सोडविण्यासाठी विकास परिषदेचे सर्व सदस्य, बंधारा कृती समितीचे सदस्य, राजकीय पक्षाचे प्रमुख, सर्व पत्रकार, विविध संस्थेचे कार्यकर्ते यांची बैठक झाली, बाभळी बंधाऱ्या संदर्भात व धर्माबाद विकास कामाच्या बाबतीत कार्यकर्त्यांनी विचार मांडले. धर्माबाद विकास कामासाठी कोणताही राजकीय पक्षपात न करता एका दिलाने काम करण्याचा, संघर्ष व आंदोलन करण्याचा, एक मताने लढा उभारण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नागभूषण वर्णी, भाजप तालुका अध्यक्ष रवींद्र पोतगंटीवार, माजी नगर उपाध्यक्ष सखाराम निलावार, पत्रकार संजय कदम, संचालक दत्ताहरी पाटील आवरे, शिवसेनेचे जिल्हा संघटक गणेश गिरी, तालुका प्रमुख रामचंद्र रेड्डी, शिवसेनेचे नायगाव विधानसभा संघटक शिवराज भाऊ मोकळीकर, माजी उपप्राचार्य गोविंदराव पाटील मिरकुटे, काँग्रेस शहराध्यक्ष ताहेर पठाण, माजी नगरसेवक संजय पवार, प्रा. उत्तमराव टाकळे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका सरचिटणीस गौतम देवके, बी आर एस चे नवीन पाटील बन्नाळी कर, पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश पाटील शिंदे, यांनी बाभळी बंधारा संदर्भात व धर्माबाद विकास कामासाठी तालुक्यातील अनुशेष भरून काढण्यासाठी विविध विषयावर मत मांडले.विकास कामासाठी आम्ही लढा देण्यासाठी सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येण्याचा निर्धार केला.
या बैठकीस तुकाराम पाटील राहेर, संचालक शिवाजी पाटील बाभळीकर, आनंदराव पाटील शिंदे, माजी बांधकाम सभापती सुधाकरराव जाधव, पत्रकार चंद्रभीम हौजेकर, नारायण सोनटक्के, नागनाथ माळगे, गोविंद पाटील सोनटक्के, शेषेराव धावणे,छावा तालुका अध्यक्ष शिवराज पाटील चोळाखेकर, राजू शिरामणे, सरपंच शंकरराव राजुरे शेळगावकर, व अन्य मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. बालाजी कोम्पलवार यांनी बाभळी बंधारा संदर्भात एकूण सहा मागण्या महाराष्ट्र व तेलंगानाचे मुख्यमंत्री ठराव घेऊन केंद्रीय जल आयोगाच्या माध्यमातून तडजोड करून सर्वोच्च न्यायालयाकडे ठराव पाठवून मंजूर करून घेऊ शकतात म्हणून कृती समितीच्या लोकांनी तेलंगाना व महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याची भेट घेऊन समुद्राला पाणी सोडण्याऐवजी तेलंगाना व महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळावे यासाठी लढा उभारण्याचा निर्धार केला आहे. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ही समिती भेट घेण्याचे प्रयत्न करणार आहे.
या बैठकीचे अध्यक्ष तथा मराठवाडा जनता विकास परिषदेचे ता.अध्यक्ष गणेशराव पाटील करखेलीकर यांनी या बैठकीत घेतलेले सर्व आराखडा व ठराव एक सप्टेंबर पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हाती पोहोचले पाहिजे की जेणेकरून मराठवाडा मुक्ती संग्रामातील पहिले हुतात्मा गोविंदरावजी पानसरे यांच्या कर्मभूमीत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार कृती समितीचे सहसचिव जी. पी.मिसाळे यांनी केले.
या सर्वपक्षीय बैठकीमुळे धर्माबाद करा मध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. हि बैठक संपन्न होताच धर्माबाद च्या विकासात्मक कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट व्हावी म्हणुन खासदार श्रीकांत शिंदे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहायक बालाजी खतगावकर यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धर्माबाद शहरातील विश्वासू समर्थक सतिष पाटिल शिंदे यांनी संपर्क साधून उपरोक्त विषयी माहिती कळविली आहे. या बैठकीत बाभळी बंधारा कृती समितीचे सर्व पदाधिकारी व जनता विकास परिषदेचे कार्यकर्ते,पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी, नेते कार्यकर्ते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या