बाभळी बंधाऱ्याचे 14 दरवाजे बंद केले बंधाऱ्यात साठलेल्या जलसाठ्यांची करायचे काय?- डॉ. बालाजी कोंपलवार.

(धर्माबाद प्रतिनिधी-नारायण सोनटक्के)

तालुक्यातील गोदावरी नदीवरील बाभळी बंधारा बांधण्यासाठी सर्वपक्षीय बाभळी बंधारा कृती समितीने लढा दिला.


सतत 7 वर्षांपासून सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया नुसार दि. 29 ऑक्टो. ते दि.10 जुलै आठ महिने जलसाठा करून त्याचा काहीच उपयोग न करता सोडून देण्यात येत असल्याने बंधार्‍याच्या उपयोग काय?
असा प्रश्न बाभळी बंधारा कृती समितीचे सचिव डॉ. बालाजी कोंपलवार यांनी केला .

याप्रसंगी सहसचिव जी. पी. मिसाळे, संपादक कालिदास अंतोजी, नांदेड भा.स्काऊट गाईड जिल्हाचे सचिव बालाजी कुदाळे उपस्थित होते.

बंधाऱ्यातील जलसाठ्यात तील पाण्याचा उपयोग नदी काठच्या शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचेल अशया उपसा जलसिंचन योजना चालू करण्यात, धर्माबाद, कोंडवाडी, बिलोली येथील तलावात पाणीसाठा करून शेती करावी अशी मागणी कृती समितीने केली. पण उदासीन राज्य सरकार व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याची खंत बोलून दाखविली.

यावर्षी पर्जन्य 100% झाल्याने बाभळी बंधारा 2. 74 टी. एम. सी. भरण्याची शक्यता आहे.
या पाणी पातळी मुळे सखल भागातील शेती पाण्याखाली आल्याने हजारो एकर जमिनीवरील रब्बी पिकाचे नुकसान होत असल्याने याचा सर्वे करून जमिनीचा मावेजा, नुसकान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
दि. 29 ऑक्टोबर रोजी पाणी पातळी 331. 90 मीटर म्हणजे 0. 45 टी.एम.सी .असुन सकाळी 6 ते 1. 30 वाजेपर्यंत 14 दरवाजे खाली सोडण्यात आले
. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे त्रिस्तरीय समितीचे केंद्रीय जल आयोजनाचे कार्यकारी अभियंता एन. श्रीनिवास राव तेलंगाना स्टेट चे अधीक्षक अभियंता डी .सुशीलमहाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अभियंता एम.पी गव्हाणे बाभळी पाटबंधारे उपविभागीय अभियंता,
मोहनराव कार्यकारी अभियंता लोअर गोदावरी विभाग, हैदराबाद. उपविभागीय अभियंता पडवळ,टि.जगदीब उपविभागीय अभियंताउपविभागीय अभियंता पोचमपाड,
पोलीस निरीक्षक सोहन माछरे,क.अभियंता सचिन देवकांबळे आर .के. मुक्कावार, स्था.अ. सहाय्यक डी.एल .पांडे, गड्डेवार,मसुदखान ड्रायव्हर
पत्रकार लक्ष्मण पाटील येताळे ,अहमद लड्डा ,देसाई हनमंतू , तुकाराम पाटील राहेर ,देवराव पाटील मोकलीकर, मा.पो.पा . विठ्ठल पाटील ,शिवाजी पाटील सूर्यवंशी ,श्रीमती सुनिता पाटील बाभळीकर, संजय उमडे, विठ्ठल रेड्डी यांची उपस्थित होती.

ताज्या बातम्या