सध्या होत असलेली विधानसभा निवडून ही कुठल्या टप्यावर येऊन ठेपली आहे हे प्रत्येकाला विचार करावयास भाग पाडणारी निवडणूक आहे.जिकडे पाहवे तिकडे धर्मवाद जातीवाद करून राजकरण केले जात असल्याचे पाहवयास मिळत आहे.गेल्या ७५ वर्षात कुणाच भल झाल हे सांगण अवघड आहे.अशा भयानक परिस्थितीत प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी ओळखून मोठ्या जबाबदारीन मतदान करणे अवश्यक आहे.हे करीत असतांना भारतिय राज्य घटनेचा शस्त्रा प्रमाणे वापर केल्यास अनंत अडचणीचा सामना करावा लागणार नाही असेही आ.बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले.
दि.१३ रोजी बिलोली येथे तिसऱ्या आघाडीचे उमेदवार माजी आ.सुभाष साबणे यांची विराट प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करीत असतांना आ.बच्चू कडू हे बोलत होते. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी आघाडी व युती सरकारवर कडाडून हल्ला करून या सरकारच्या कार्यकाळात शेतकरी कसा देशोधडीला लागला यास काँग्रेस तसेच भाजपा कसे कारणीभूत आहेत हेही सांगितले.
यावेळी प्रामुख्याने शेतकरी नेते गुणवंत पाटील हंगरगेकर, धोडिंबा पवार, दिव्यांगाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल देशमुख, राहूल नावंदे, सरपंच संघटनेचे तालुकाध्य महेश पा.हंडे, गजानन पाटील, भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव मावलगे, राजू पाटील शिंदे, सय्यद रियाज, साहेबराव पाटील शिंदे हरनाळीकर, जावेद कुरेशी, भाऊसाहेब बनबरे यांच्यासह तालुक्यातील महिला पुरूष हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy