माळेगाव यात्रेतील पशु प्रदर्शनात नांदेड येथील प्रसिध्द हॉटेलचालक नंदकिशोर अडकटलवार यांचा नामांकित असलेला अलिशान या ब्लड लाईन अश्वाला ‘बगीरा’ दोन दाताच्या गटात पारितोषीक मिळाले आहे जिल्हा परिषदेच्या अधिकारी मिनल करनवाल यांनी हे पारितोषीक देवुन गौरव केला.पशुधनाची हा अश्व पहाण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
एकेकाळी घोड्यावरुन वाहतुक केली जात होती. हा काळ आता लोप पावत चालला आहे. आता विविध वाहतुकीचे साधन निर्माण झाली आहेत. असे असतानाही आजही देशात घोडे पालन करण्याची हौस मोठ्याप्रमाणात आहे. दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र खंडोबा रायाच्या यात्रेत पशुधनाची स्पर्धा दोन दात वयाच्या स्पर्धेत पारितोषिक खरेदी विक्रीसह आश्वाचे प्रदर्शन, खरेदी विक्री होत असते.
घोडेबाजारात दरवर्षी देशातील विविध भागातील अश्वप्रेमी यात्रेत घोडे खरेदी-विक्री करतात. या यात्रेत देशाच्या विविध भागातून घोडेपालकही सहभागी होतात. यंदा मालेगाव यात्रेत दि १० ते १४ रोजी पर्यंतही यात्रा सुरु होती. या यात्रेत घोड्यांच्या सौंदर्य शर्यती, घोड्यांचे शो,नृत्यासह बऱ्याच प्राण्यांच्या स्पर्धा होतात. अश्व या जातीत मारवाडी त्यात रक्त हा त्या युध्द अश्व ग्रेट अश्वाला पहिली पसंती दिली जाते.
अलिशान ही जात अश्वात श्रेष्ठ समजली जाते. या जातीत अश्वलाईन गटातील घोड्याला जास्त मान मिळत असतो या जातीचा अश्व राजस्थानातील रौतागडच्या सिध्दार्थसिंग रोहत यांच्याकडे होता. अश्वामुळे या राज्यानी अनेक जिंकले होते. या जातीचा एक हा हिंदी चित्रपट सृष्टीतील सलमान खान यांच्याकडे आहे. त्या गॅबलर या नावाच्या अश्वाचा मुलगा हा “बगीरा” आहे. याची उंची ६५ इंच असुन तो केवळ बत्तीस महिन्याचा आहे.
तो दोन दातावर असल्याने त्याच्यातील रुबाबदार बाणा, बहरदार शरिरयष्टी यामुळे तो या माळेगाव यात्रेत विशेष आकर्षण ठरला आहे. दि ११ रोजी झालेल्या पशुधन स्पर्धेत त्याला दोन दाताच्या गटात पारितोषीक देवुन गौरविण्यात आले. त्याबदल अश्वाचे मालक अनुज अडकटलवार यांनी हा पुरस्कार स्विकारला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्यासह पशुधन विकास अधिकारी डॉ सुनील गिरी आणि गुट्टे, निखिलेश देशमुख, आश्विन पवार, वासुदेव भोसले, प्रणव सोवठे यांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मानचिन्ह देवुन गौरव करण्यात आला. हा अश्व बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. अनुज अडकटलवार हे नायगाव येथील चन्नावार परिवारातील जावई आहेत मंजुवाले यांच्या अश्वाला माळेगाव यात्रेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांच्या चाहत्या वर्गाकडून व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy