बहुभाषिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णा तिम्मापुरे तर सचिव गंगाधर धडेकर यांची बिनविरोध निवड !
(धर्माबाद प्रतिनिधी-नारायण सोनटक्के)
तालुका बहुभाषिक पञकार संघाच्या अध्यक्षपदी कृष्णा तिम्मापुरे तर सचिवपदी गंगाधर धडेकर व उपाध्यक्ष पदी सुरेश घाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
माजी अध्यक्ष माधवराव हनमंते यांनी एक वर्ष यशस्वी पणे पार पाडल्यानंतर,धर्माबाद तालुका बहुभाषिक पञकार संघाच्या कार्यकरणीचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे, धर्माबाद येथील शासकीय विश्रामगृहावर बहुभाषिक पञकार संघाची बैठक रविवारी सकाळी घेण्यात आली आहे.
सदरील बैठकीत विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.तसेच सर्वानुमते बहुभाषिक पञकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
यात अध्यक्षपदी कृष्णा तिम्मापुरे,उपाध्यक्ष सुरेश घाळे, सचिव गंगाधर धडेकर, सहसचिव व्यंकटराव डोईवाड, कोषाध्यक्ष पोतन्ना लखमावाड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शक अंनतोजी कालीदास,रमेश कत्रुरवार, सुदर्शन वाघमारे,माधव हनमंते,सदस्य – अशोक पडोळे, महेश जोशी,धनंजय गायकवाड,पंडीत जाधव,नारायण सोनटक्के, बालाजी बकवाड, अब्दुल खदीर, विनोद तगडपल्लेवार,नारायण ईबितवार यांची उपस्थिती होती.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत या बैठकीत करण्यात आले आहे.